Ishan Kishan Net Worth: बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या ईशान किशनचं (Ishan Kishan) नाव आता प्रत्येकाच्या तोंडावर आहे. काल भारताच्या या फलंदाजाने बांगलादेशाच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. आपल्या द्विशतकामध्ये ईशानने 24 फोर आणि 10 सिक्स लगावले आहे. केवळ 126 बॉल्समध्ये त्याने डबल सेंच्युरी (Ishan Kishan Double century) लगावली. केवळ टीम इंडियाकडून नाही तर आयपीएलमध्येही (IPL) त्याचा चांगला खेळ आहे. ईशान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असून तो सर्वात महागडा खेळाडू होता. दरम्यान हा महागडा खेळाडू गडगंज संपत्तीचा देखील मालक आहे.
बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातूव आलेला ईशान फार कमी वयातच करोडपती बनला. डबल सेंच्युरीनंतर त्याच्या गावातील घरात आनंद साजरा करण्यात आला. मिडीया रिपोर्टनुसार, 2022 मध्ये त्याचं नेट वर्थ 45 करोड रूपये आहे. त्याच्या कमवण्याचा सोर्स हा क्रिकेटपासून मिळणारी फी, लीग क्रिकेट कॉन्ट्रॅक्ट आणि ब्रांड एंडोर्समेंट आहेत. आता ईशानची ब्रँड वॅल्यू बरीच हाय झाली आहे. यासाठी तो एक मोठी रक्कम चार्ज करतो.
इशान किशन दर वर्षाची कमाई जवळपास सात करोड रूपये असल्याची माहिती आहे. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने ईशानला 15.25 करोडला खरेदी केलं होतं. 2018 मध्ये मुंबईने किशनवर 6.20 ची बोली लावली होती. मुंबईशिवाय ईशान गुजरात लायन्सकडून देखील खेळला आहे. तर रणजी ट्रॉफीमध्ये तो झारखंडकडून खेळतो.
काही रिपोर्ट्सनुसार, ईशान किशनकडे कोट्यवधी रूपयांच्या गाड्या आहेत. त्याच्याकडे BMW 5 series असून त्याची किंमत जवळपास 72 लाख आहे. याशिवाय त्याच्याकडे 92 लाखांची Ford Mustang आणि 1.05 कोटींची Mercedes Benz C-Class ही गाडी देखील आहे.
याशिवाय इशानने रिअल इस्टेटमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. ईशानचे वडील प्रणव कुमार पांडे हे व्यवसायाने एक बिल्डर आहेत. तर आई सुचित्रा पांडे या गृहिणी आहेत. दरम्यान ईशानच्या स्फोटक द्विशतकानंतर त्याची ब्रँड व्हॅल्यू आणखी वाढू शकते.