James Anderson Mohammad Rizwan: मुलतानच्या क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) खेळल्या जात असलेल्या पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG 2nd Test) यांच्यातील दुसरा कसोटी सामना आता रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. इंग्लंडचा दुसऱ्या डावात पाकिस्तानने 275 धावांवर गुंडाळला. त्यानंतर आता पाकिस्तानची अवस्था देखील अवघड झाल्याचं दिसतंय. त्यानंतर आता चर्चेचा विषय ठरतोय इंग्लंडचा स्टार गोलंदाज (James Anderson) जेम्स अँडरसन. (James Anderson bold Mohammad Rizwan in PAK vs ENG 2nd Test match watch video marathi news)
पाकिस्तान विरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात, इंग्लंडचा दुसरा डाव (PAK vs ENG 2nd Test) 275 धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडने पाकिस्तानला विजयासाठी 355 धावांचं लक्ष्य दिलंय. त्यामुळे पाकिस्तानची मुलताच्या मैदानावर 'कसोटी' लागली आहे. अशातच पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची विकेट (Mohammad Rizwan Wicket) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
जेम्स अँडरसन (James Anderson) म्हणजे 40 वर्षाचा तरूण खेळाडू... याच अँडरसनने तरुण पोरांना लाजवेल अशी फिटनेस राखली. त्याचबरोबर बॉलिंग धार कधी कमी होऊन दिली नाही. याचाच प्रत्यय पहायला मिळाला. मागील सामन्यात पाचव्या क्रमांकावर उतरलेला रिझवान दुसऱ्या डावात सलामीला आला. त्यावेळी अँडरसनने रिझवानचा सुरेख बोल्ड (James Anderson bold Mohammad Rizwan) काढला.
Just WOWWWW
Sir James Anderson, you beauty !!
Old Wine #PAKvsENG pic.twitter.com/G8arTSV0E3— Nishant Sharma (@Nishant6862) December 11, 2022
Legendary bowler legendary delivery. Rizwan gone. Anderson takes his 1st wicket in 1st over. A bit of reverse swing and Rizwan misses. Huge dent to Pakistani cricket team. Commentators stunned #PAKvsENG
Imam#PakvsEng2022
Harry Brook#Ronaldo pic.twitter.com/aubNcoeaRw— sports.world (@fariaawan5) December 11, 2022
दरम्यान, मॅजिकल बॉल पाहून रिझवानची हवा टाईट झाल्याचं दिसतंय. पाकिस्तानच्या अबरार अहमद याचा हा डेब्यू सामना आहे. अबरारने त्याच्या गोलंदाजीच्या जादूने इंग्रजी खेळाडूंची (England team) चांगली दाणादाण उडवल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर आता सामना कोणाच्या बाजूने झुकतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.