IND vs ENG: इरफान पठाणही झाला आकाश दीपच्या घातक गोलंदाजीचा फॅन, केली मोठी भविष्यवाणी!

Irfan Pathan Statement : टीम इंडियाचा माजी फास्टर गोलंदाज इरफान पठाण याने आकाश दीपचं (Akash Deep) तोंडभरून कौतूक केलंय.

सौरभ तळेकर | Updated: Feb 25, 2024, 05:11 PM IST
IND vs ENG: इरफान पठाणही झाला आकाश दीपच्या घातक गोलंदाजीचा फॅन, केली मोठी भविष्यवाणी! title=
Irfan Pathan, Akash Deep, India vs England 4th Test

India vs England 4th Test : सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट मालिकेत काही युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये सरफराज खानपासून ते आकाश दीप (Akash Deep) यांचा समावेश होतो. आपल्या उल्लेखनिय कामगिरीमुळे आता टीम इंडियाचं भविष्य तयार होत असल्याचं दिसून येतंय. अशातच आता चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा गोलंदाज आकाश दीप याने तीन महत्त्वाच्या विकेट्स मिळवत इंग्लंडला अडचणीत टाकलं होतं. अशातच आता टीम इंडियाचा माजी फास्टर गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan Statement) याने आकाश दीपचं तोंडभरून कौतूक केलंय.

काय म्हणतो इरफान पठाण?

फलंदाज म्हणून पदार्पण भारतात व्हावं असं अनेकांना वाटतं, पण वेगवान गोलंदाज म्हणून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंडमध्ये पदार्पण करण्याचं स्वप्न अनेक गोलंदाजांचं असतं. सामन्याच्या पहिल्या सत्रात आकाश दीपने ज्या पद्धतीने गोलंदाजी करत तीन बळी घेतले ते कौतुकास्पद आहे. आकाशच्या करिअरचा आलेख इथूनच वर जाईल. येत्या काळात आकाश दीप टीम इंडियाचा आश्वासक चेहरा म्हणून समोर येईल, असं इरफान पठाणने म्हटलं आहे.

यशस्वी जयस्वाल हा खूप खास क्रिकेटर आहे. कसोटी मालिकेत 600 किंवा त्याहून अधिक धावा करणारा देशातील पाचवा खेळाडू ठरला. त्याचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. अशा खेळाडूंच्या जोरावर मी म्हणू शकतो की, भारतामध्ये क्रीडा राष्ट्र बनण्याची क्षमता आहे, असं वक्तव्य इरफान पठाणने केलंय.

टीम इंडिया विजयाच्या उंभरठ्यावर

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडिया मजबूत स्थितीत होती. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटूंचा दबदबा पहायला मिळाला. आश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादवने चार विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. त्याचबरोबर जडेजाच्या खात्यात एक विकेट आली.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.