डबलिन : आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 2 सामन्यांच्या (IRE v IND T20I Series 2022) टी 20 मालिकेला रविवारपासून सुरुवात होतेय. मालिकेतील पहिला सामना हा डबलिनमधील कॅसल अव्हेन्यूध्ये खळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचं या मालिकेत हार्दिक पंड्या पहिल्यांदाच नेतृत्व करणार आहे. तर आयर्लंडची जबाबदारी एंड्रयू बलबर्नीकडे असणार आहे. (ire vs ind t20i series 2022 match 1 on 26 july prediction previews Hardik Pandya will lead for 1st time)
टीम इंडियाची सीनियर टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे या आयर्लंड दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असणार आहे.
ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दोघांच्या जागी आयर्लडं विरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. तसेच दुखापतीनतंर परतलेला सूर्यकुमार यादव तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येऊ शकतो.
तसेच अर्शदीप सिंह आणि उमरान मलिका या युवा खेळाडूंवर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या दोघांनी नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या 15 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली होती. क्रिकेट चाहत्यांना तशाच कामगिरीची अपेक्षा आता आयर्लंड विरुद्ध असणार आहे. त्यामुळे हे दोघे काय कारनामा करतात, याकडे लक्ष असेल.
हार्दिक पंड्या (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.
एंड्रयू बलबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कँपर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, जोश लिटिल, एंड्रयू मॅकब्राइन, बॅरी मॅकार्थी, कॉनर ओल्फर्ट, पॉल स्टलिर्ंग, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर आणि क्रेग यंग.