आयपीएलमधून टीम मालक असा पैसा वसूल करतात...

आयपीएलला क्रिकेटच्या एका फॉर्मेटमध्ये पाहिलं जातं, पण वास्तव असं आहे की, आयपीएल बिझनेस म्हणूनच सुरू करण्यात आलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 29, 2018, 12:24 AM IST
आयपीएलमधून टीम मालक असा पैसा वसूल करतात... title=

मुंबई : आयपीएलला क्रिकेटच्या एका फॉर्मेटमध्ये पाहिलं जातं, पण वास्तव असं आहे की, आयपीएल बिझनेस म्हणूनच सुरू करण्यात आलं, फ्रेंचाइजीने देखील आयपीएलकडे फक्त व्यवसाय म्हणूनच पाहिलं.

कॉर्पोरेट जगत जोडण्यात आलं

आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेट जगताला कॉर्पोरेट जोडण्यात आलं. तसं सर्व सामान्य माणसाला हे सहज समजणार नाही, यासाठी हे समजून घेतलं पाहिजे की, आयपीएल फ्रेचाइजी करोडो रूपये खर्च करून, त्याची वसूली आणि त्यानंतर पुढची कमाई कशी करून घेते.

टीमच्या टीशर्टवर लोगोपासून पैशाला सुरूवात

आयपीएलने कॉर्पोरेट इंडियाला स्पॉन्सर्ससाठी प्रेरीत केलं, कधी प्लेअर्सच्या टीशर्टवर कंपनीचा लोगो लावण्यासाठी कॉ़र्पोरेटकडून पैसे दिले जात नव्हते. पण यासाठी आता मोठा रक्कम मोजली जात आहे. आंतरराष्ट्रीय तसेच भारताच्या तमाम मोठ्या कंपन्या यासाठी स्पॉन्सर करतात.

१) मीडिया राईटस

आयपीएल टीमचा एकूण कमाईचा पैसा ६० ते ७० टक्के हा मीडिया राईटस मधून येतो, मीडिया राईटस म्हणजे आयपीएलचं प्रसारण करणाऱ्या चॅनेल्सकडून ते पैसे टीमला त्या टीमच्या परफॉर्मनुसार दिले जातात. यात टेलिव्हिजन चॅनेल्स आणि स्पोर्टस वेबसाईटचा समावेश आहे.

लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी देखील मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात. या पैशांचं वाटप टीमच्या जय-पराजयवरून जे रँकिंग होतं, त्यावर टीमला पैशांचं वाटप केलं जातं.टीमची रँकिंग जेवढी चांगली तेवढा जास्त पैसा त्या टीमला मिळतो.

२) तिकीट विक्री

स्टेडियम तिकीट विक्रीपासून फ्रेंचाईजी मोठी कमाई करते, तिकिटाचा दर टीमचा मालक ठरवत असतो, आयपीएल टीमचा महसुलाचा १० टक्के भाग, मॅचच्या तिकीट विक्रीतून येतो.

३) बक्षिसाची रक्कम  

बक्षिसाची रक्कम टीमचा मालक आणि खेळाडू वाटून घेतात, आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात रोख रक्कम बक्षिस म्हणून दिली जाते. २०१७ मध्ये ४७ कोटी बक्षिस म्हणून देण्यात आले होते. चॅम्पियन्स टीमला बक्षिसाची मोठी रक्कम मिळते.

४) किट आणि जर्सीवरही पैशांचा पाऊस

ब्रॅण्ड स्पॉन्सरशीपच्या माध्यमातून आयपीएल टीमच्या मालकांना मोठी कमाई होते, फ्रेचायझी ब्रॅण्डसोबत सिझनचा करार करून लोकांनी टीमची किट आणि जर्सी जागेवर देतात. स्टेडियमच्या बाऊंड्रीवर लावण्यात येणाऱ्या जाहिराती, लांबी-रूंदी आणि दर्शनी भागाप्रमाणे विकल्या जातात.

टीमच्या जर्सीच्या फ्रंट आणि बॅकवर लोगो छापून, सर्वात मोठी स्पॉन्सरशीप चुकवावी लागते. एकूण कमाईचा स्पॉन्सरशीपचा भाग २० ते ३० टक्के असतो.

५) नवीन ब्रॅण्डची आयपीएलवर नजर

नवीन ब्रॅण्ड आयपीएलच्या या नव्या मंचावर खूप पैसा खर्च करतात, याचं एक ताज उदाहरण म्हणजे, चीनी मोबाईल कंपनी ओप्पो. कंपनीने भारतात क्रिकेट टीमच्या कपड्यांवर लोगोसाठी खर्च केला. 

या अधिकार त्यांनी १ हजार ७९ कोटी रूपयात खरेदी केला. चीनी कंपनी वीवोने भारतात मजबूत पाय रोवण्यासाठी आयपीएलच्या माध्यमातून ७६८ कोटी लावले.

आक्रमकपणे बिझनेस
कंपन्यांनी आक्रमकपणे बिझनेस केला, जाहिराती केल्या. मागील वर्षी जिओ लॉन्च झाल्यानंतर जिओने कोट्यवधी रूपयांची स्पॉन्सरशीप देऊन, जाहिरात जगताला हलवून सोडलं.