list of retained players: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२५ संदर्भात अनेक नियम, धोरणे जाहीर केली आहेत. अशातच आता आयपीएल २०२५च्या मेगा लिलावाच्या आधी रिटेंशन पॉलिसी जारी केली आहे. या पॉलिसीनुसार यंदा सर्व फ्रँचायझी त्यांच्या संघातून एकूण सहा खेळाडूंना कायम ठेवू शकते अर्थात रिटेन करू शकते. या सहा खेळाडूंपैकी पाच खेळाडू कॅप केले जाऊ शकतात, तर जास्तीत जास्त २ खेळाडू अनकॅप केले जाऊ शकतात. दरम्यान सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या रिटेन केल्या जाणाऱ्या खेळाडूंची नवे कधी जाहीर केली जाणार. आता या प्रश्नाचे उत्तरही मिळाले आहे.
रिटेंशनची यादी कधी जाहीर होणार?
बेंगळुरू येथे झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर रिटेनशन पॉलिसी जाहीर करण्यात आली. आता कोणते खेळाडू रिटेन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्रँचायझीकडे लिलावापूर्वी रिटेन करून ठेवलेल्या खेळाडूंची यादी फायनल करून सबमिट करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेळ आहे.
आयपीएल २०२५ चा रिटेंशन नियम
आयपीएल २०२५ पूर्वी, सर्व संघ जास्तीत जास्त सहा खेळाडू रिटेन करू शकत होते. यामध्ये राईट टू मॅच कार्ड देखील समाविष्ट असेल. जर टीमने लिलावापूर्वी सहा खेळाडूंना रिटेन ठेवले तर त्यांच्याकडे लिलावात आरटीएम कार्ड नसेल. याचा अर्थ, फ्रँचायझी जितके कमी खेळाडू राखून ठेवेल, तितके जास्त राईट टू मॅच कार्ड्स असतील, जे ते लिलावात वापरू शकतात.
कोणत्या खेळाडूंचा कॅप्ड खेळाडूंमध्ये समावेश केला जाणार?
३१ ऑक्टोबरपूर्वी कोणत्याही खेळाडूने जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यास त्या खेळाडूला कॅप्ड खेळाडू मानले जाईल. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी नुकतीच भारतीय टीमने घोषणा केली आहे. या संघात नितीश कुमार, मयंक यादव आणि हर्षित राणा यांना स्थान मिळाले आहे. आता यापैकी ज्या खेळाडूला बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेत खेळण्याची संधी मिळेल तो कॅप्ड खेळाडूंच्या यादीत सामील होईल. हे खेळाडू सध्या अनकॅप्ड आहेत.
आयपीएल २०२५ मधले आठ नवीन नियम
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या सीजनपूर्वी आठ मोठे नियम तयार करण्यात आले आहेत. फ्रँचायझी रिटेन्शन, मॅच फी, दोन सिजनसाठी बंदी, इम्पॅक्ट प्लेयर नियम, परदेशी खेळाडूंची नोंदणी, लिलावाची रक्कम, राईट टू मॅचचा पर्याय आणि कॅप्ड-अनकॅप्ड याबाबतीतले सगळे नियम आहेत.