'तू चड्डीत असताना...', रोहित शर्माने मैदानातच लखनऊच्या खेळाडूला सुनावलं, 'अरे यार...'

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) लखनऊ सुपरजायंट्सच्या (Lucknow Super Giants) खेळाडूशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसला. यावेळी त्याचं वय ऐकताच रोहित शर्मा त्याच्या स्वभावाप्रमाणे मस्करी करताना दिसला.   

शिवराज यादव | Updated: May 1, 2024, 08:59 PM IST
'तू चड्डीत असताना...', रोहित शर्माने मैदानातच लखनऊच्या खेळाडूला सुनावलं, 'अरे यार...' title=

IPL 2024: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) सामन्यानंतर लखनऊ सुपरजायंट्सच्या (Lucknow Super Giants) अनुभवी फिरकीपटूसोबत चर्चा करताना दिसला. लखनऊ सुपरजायंट्सने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत रोहित शर्मा फिरकी गोलंदाज अमित मिश्राशी (Amit Mishra) मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी अमित मिश्राने आपलं वय सांगितलं असता, रोहित शर्मा आश्चर्यचकित झाला होता. अमित मिश्रा 40 वर्षांचा आहे यावर रोहित शर्माचा विश्वासच बसत नव्हता. यानंतर रोहित शर्मा आपल्या स्वभावाप्रमाणे अमित मिश्राची फिरकी घेताना दिसत आहे. तो अमित मिश्रासह त्याच्या वयाचा पुरावा मागतना पदार्पण कधी केलं? अशी विचारणा करताना दिसत आहे. यावेळी अमित मिश्राने आपलं वय 41 असल्याचं सांगतो. त्यावर रोहित शर्मा चड्डीत असतानाच पदार्पण केलं का? अशी खिल्ली उडवतो. 

दरम्यान सामन्याबद्दल बोलायचं गेल्यास मॅचमध्ये मार्कस स्टॉइनिसने पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन केलं. लखनऊने या सामन्यात मुंबई इंडियन्सवर चार गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ आता प्लेऑफमधून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मुंबई संघ आता उर्वरित सामने जिंकूनही टॉप 4 साठी पात्र ठरू शकत नाहीत.

सामन्यानंतर लखनऊचा कर्णधार के एल राहुलने विजयावर तसंच प्लेऑफमधील संधीवर भाष्य केलं. "आमच्याकडे अजूनही मधल्या फळीतील फलंदाज होते. पूरन आणि केपीसारखे अनुभवी फलंदाजही आहेत. खेळपट्टी थोडी कोरडी होती. 165-170 धावसंख्या स्पर्धात्मक ठरली असती. या विकेटशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. जेव्हा तुम्हाला ते दोन गुण मिळतात तेव्हा नेहमी आनंद होतो आणि आम्हाला स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात गती मिळण्यास मदत होते,” असं राहुल म्हणाला. 

"मी मयंकशी जास्त बोललो नाही. त्याला शरिरात काही वेदना होत आहेत. थोडं दुखतंय असं त्याने सांगितलं, म्हणून मी त्याला बाहेर जायला सांगितले. तो आमच्यासाठी उपयुक्त आहे. आम्हाला त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याने गोलंदाजी केली. त्याने टाकलेले वाइड यॉर्कर्स आणि स्लो बंपर पाहायला बरं वाटत होतं. आम्ही त्याला स्वातंत्र्य दिलं आहे," असंही त्याने सांगितलं. 

मुंबई संघात दुफळी?

मुंबई इंडियन्स संघ दोन गटात विभागला गेला असून, त्यामुळे खेळाडूंना एकत्रितपणे खेळण्यात अडथळा येत आहे असा मोठा दावा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने केला आहे. तसंच मोठ्या स्पर्धा जिंकणे वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कार्यावर जास्त अवलंबून असतं असं मत मांडलं आहे. "ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील की नाही याबाबत मला कल्पना नाही. मुंबई इंडियन्स संघाला सकारात्मक विचार ठेवावा लागेल. पण मला वाटतंय मैदानात जे दिसत आहे, त्याच्या व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स संघात बरंच काही सुरु आहे. तुमच्याकडे इतके चांगले खेळाडू असताना, सतत इतकी वाईट कामगिरी करु शकत नाही," असं मायकल क्लार्कने म्हटलं आहे.