IPL 2024 : गौतम गंभीरची नवी चाल! आयपीएलपूर्वी कोलकाता संघात मोठा उलटफेर, 'या' बॉलरची अचानक एन्ट्री

Kolkata Knight Riders Squad For IPL 2024: ॲटकिन्सनच्या जागी केकेआरने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराचा संघात समावेश केलाय. 

सौरभ तळेकर | Updated: Feb 19, 2024, 06:19 PM IST
IPL 2024 : गौतम गंभीरची नवी चाल! आयपीएलपूर्वी कोलकाता संघात मोठा उलटफेर, 'या' बॉलरची अचानक एन्ट्री title=
IPL 2024, Kolkata Knight Riders, Dushmantha Chameera

Kolkata Knight Riders Squad IPL 2024: आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मोठा धक्का बसला आहे. केकेआरचा वेगवान बॉलर गस ऍटकिन्सन स्पर्धेतून बाहेर गेल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे आता इंग्लंडच्या ऍटकिन्सनचं (Gus Atkinson) आयपीएल खेळण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं आहे. ॲटकिन्सनच्या जागी केकेआरने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराचा (Dushmantha Chameera) संघात समावेश केलाय. त्यामुळे आता केकेआरला काही प्रमाणात दिसाला मिळाला आहे. नव्या गोलंदाजामुळे आता कोलकाताला आणि कोच गौतम गंभीरला किती फायदा होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दुष्मंथा चमीरा याआधी लखनऊ सुपर जायंट्स, 2018 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएल खेळला आहे. मात्र, त्याला फार संधी मिळाली नाही. कोलकाताने 50 लाखाच्या त्याच्या मुळ किमतीवर त्याचा संघात समावेश केला आहे.  मागील हंगामात चमीरा लखनऊ सुपर जाएन्टसकडून खेळला होता. यंदाच्या हंगामापूर्वी त्याला रिलीज करण्यात आलं होतं. अशातच आता कोलकाताने संधीचं सोनं करून त्याला संघाला सामील करून घेतलंय.

कोलकाताचा कॅप्टन कोण?

कोलकाता नाईट रायडर्समध्ये सध्या कॅप्टन्सीवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षी श्रेयसच्या दुखापतीमुळे नितीश राणाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यंदाच्या वर्षी आता कॅप्टन कोण असणार? हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. मिचेल स्टार्कला केकेआरने 24.75 कोटींच्या किमतीत खरेदी केलं होतं. त्यामुळे आता गौतम गंभीर कोणाला कॅप्टनची दबाबदारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सची टीम

श्रेयस अय्यर (C), नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमनुल्लाह गुरबाज, शेरफेन रदरफोर्ड, केएस भरत, मनीष पांडे, जेसन रॉय, अंगक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, रमनदीप सिंह, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुयश शर्मा, मुजीब उर रहमान, दुष्मंथा चमीरा, शाकिब हुसैन, हर्षित राणा, सुनील नरेन, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क आणि चेतन सकारिया.