Rohit Sharma Insta Story : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यातले दोन सामने जिंकत यजमान टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. राजकोट कसोटी (Rajkot Test) सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर तब्बल 434 धावांनी ऐतिहासिक विजय (Team India beat England) मिळवला. टीम इंडियाची युवा ब्रिगेडने या सामन्यात दमदार कामगिरी केली. विशेषत: यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), सरफराज खान (Sarfaraz Khan) आणि ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) या भारताच्या उगवत्या खेळाडूंनी आपली छाम उमटवली.
कर्णधार रोहित शर्माकडून कौतुक
टीम इंडियाच्या या युवा ब्रिगेडचं कर्णधार रोहित शर्मानेही कौतुक केलं आहे. रोहित शर्माने आपल्या इस्टा स्टोरीत (Rohit Sharma Insta Story) भारतीय कसोटी क्रिकेटची युवा ब्रिगेडचे फोटो लावले आहेत. हिटमॅनने आपल्या इन्स्टा स्टोरीत यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेलचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या माध्यमातून रोहित शर्माने युवा खेळाडूंच्या प्रयत्नांना शाबासकी दिली आहे. रोहितने या फोटोवर एक लक्ष वेधणारं कॅप्शनही दिलं आहे.
रोहित शर्माने या फोटोवर ये आजकल के बच्चे' असं कॅप्शन दिलं आहे. याशिवाय टाळी वाजवताचा इमोजीही शेअर केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून रोहितने यशस्वी जयस्वाल, सरफराज आणि ध्रुव जुरेल हे भारतीय क्रिकेटंच भवितव्य असल्याचं म्हटलं आहे.
युवा खेळाडूंची दमदार कामगिरी
राजकोट कसोटी सामन्यात भारताच्या युवा ब्रिगेडने दमदार कामगिरी केली. विशेषत: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी विजयात यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या युवा खेळाडूंनी मोलाचं योगदान दिलं. राजकोट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वलाने दुहेरी शतक करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारून दिली. यशस्वीने 214 धावांची नाबाद खेळी केली. यशस्वीला चांगली साथ मिळाली तर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या सरफाराज खानची.
राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात सरफराजने 62 तर दुसऱ्या डावात 68 धावा केल्या. या खेळीबरोबर सरफराजने टीमइंडियात आपली जागाही पक्की केली आह. याशिवाय विकेटकिपर ध्रुव जुरेलने राजकोट कसटोत 47 धावांची खेळी केली. याशिवाय विकेटकिपिंगमध्येही त्याने सर्वांचं लक्ष वेधऊन घेतलं. पहिल्या इनिंगमध्ये दीड शतकी खेळणाऱ्या बेन डकेतला जुरेल दुसऱ्या डावात रनआऊट करत स्वस्तात माघारी धाडलं
भारतीय कसोटी क्रिकेटचं भविष्य
सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांचा हा कसोटी पदार्पणाचा सामना होता. आणि पहिल्याच सामन्यात या दोघांनी क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकलंय. यशस्वी जयस्वालनेही केवळ 7 सामन्यात आपल्या फलंदाजीची झलक दाखवली आहे. त्यामुळे आगामी काळात हे तीन खेळाडूंकडू भारतीय कसोटी क्रिकेटचं भवितव्य म्हणून पाहिलं जात आहे.