IPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर' कुठे आणि कधी पाहाल?

IPL 2024 Opening Ceremony : देशभरातील क्रिकेटप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत, ती आयपीएल स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट कुंभमेळ्याआधी भव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.

राजीव कासले | Updated: Mar 20, 2024, 04:53 PM IST
IPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर'  कुठे आणि कधी पाहाल? title=

IPL 2024 Opening Ceremony : येत्या 22 मार्चपासून क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात इंडियन प्रीमिअर लीगला (IPL 2024) सुरुवात होतेय. जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान (CSK) चेन्नईच्या चिदंबरम स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमध्ये तब्बल नवव्यांदा सलामीचा सामना खेळणार आहे. आयपीएल 2009, 2011, 2012, 2018, 2019, 2020, 2022 आणि 2023 च्या हंगामात चेन्नईने सुरुवात केली आहे. आता पुन्हा एकदा चेन्नई सलामीचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालीय, चाहत्यांनाही पहिल्या सामन्याची उत्सुकता आहे. 

भव्य उद्घाटन सोहळा
पहिल्या सामन्याबरोबरच चाहते आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचीही (Opening Ceremony) आतुरतेने वाट पाहात आहेत. दरवेळी प्रमाणेच यावेळीही बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार उ्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्घाटन सोहळ्यात भारतीय संगीतकार एआर रहमान, सोनू निगम यांच्याबरोबर बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा परफॉर्म करतील. सोनू निगम आणि एआर रहमान यांचा एकत्रित देशभक्तीवर कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. संपूर्ण उद्घाटन सोहळा तीस मिनिटांचा असेल. 

कुठे आणि कधी असणार उद्घाटन सोहळा?
IPL 2024 चा उद्घाटन सोहळा 22 मार्चला चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअम होईल. चेन्नई आणि बंगळुरुच्या पहिल्या सामन्याआधी म्हणजे संध्याकाळी 6.30 ला उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होईल. त्यानंतर पहिला सामना रात्री 8 वाजता सुरु होईल. ज्या दिवशी दोन सामने आहेत, त्या दिवशी पहिला सामना दुपारी 3.30 आणि संध्याकाळचा सामना 7.30 वाजता खेळवला जाईल. गेल्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्याला अरिजीत सिंग, रश्मिका मंधाना आणि तमन्ना भाटिया यांनी सहभाग घेतला होता.

IPL 2024 वेळापत्रक
२२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
२३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
२४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
२५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
२६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
२८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
२९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३० मार्च - लखनऊ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखनऊ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
७ एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनऊ