IPL 2024 CSK vs LSG head to head: तब्बल पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदाही उत्तम लयीत आहे. सातपैकी चार सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेला चेन्नईचा संघ आज (23 एप्रिल) मंगळवारी विजयी हॅटट्रिक साकारण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स (CSK vs LSG) यांच्यातील IPL 2024 चा 39 वा सामना एम चिदंबरम क्रिकेट स्टेडियम चेन्नई येथे खेळवला जाईल. तर दुसरीकडे लखनऊ सुपरजायंट्सशी चेन्नई दोन हात करणार असून मुंबईकर शिवम दुबे गोलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने दोन्ही सामन्यात कोलकाता आणि मुंबईचा पराभव केला. महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार नसला तरी त्याची उपस्थिती या संघासाठी लाभदायी ठरत असून 30 वर्षीय दुबेला गवसलेसा सूर, हेच याचेच एक उदाहरण आहे. चेन्नईला (CSk) लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. आता या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी चेन्नईकडे आहे.
एमए चिदंबरम स्टेडियमवर एकूण 110 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी एका संघाने 65 सामने जिंकले आहेत. तर 45 सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या आयपीएल मैदानावर एकूण 76 सामने खेळले गेले आहे. ज्यामध्ये यजमान संघाने 51 सामने जिंकले, तर समोरच्या संघाने 25 सामने जिंकले. तर दुसरीकडे चेन्नईने एमए चिदंबरम स्टेडियमवर एकूण 67 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 48 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईने 18 सामने गमावले आहेत. चेन्नईसाठी एक सामना बरोबरीत सुटला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 30 सामने जिंकले आहेत. या मैदानावर CSK च्या एकूण 246 धावा होत्या.
चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलमध्ये एकूण 4 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चेन्नईने 1 सामना जिंकला, तर लखनऊने दोन सामन्यांमध्ये विजयाची चव चाखली. एक सामना अनिर्णित राहिला. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चेन्नईची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंसाठीही तितकीच उपयुक्त ठरू शकते. चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अधिक योग्य असली, तरी काही काळापासून येथे सामने खेळवले जात नसल्यामुळे गवत वाढले असावे, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते. मात्र, येथे चेंडू थेट बॅटवर सहजासहजी येत नाही, त्यामुळे फलंदाज मोठे फटके खेळू शकत नाहीत. जर आपण नाणेफेक बद्दल बोललो, तर कोणताही संघ नाणेफेक जिंकेल, तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल, कारण येथे लक्ष्याचा पाठलाग करणे काहीसे सोपे आहे.
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन उल हक, क्रुणाल पंड्या, युद्धवीर सिंग, प्रेरक मंकड, यशवंत ठाकूर, अमित मिश्रा, शमर जोसेफ, मयांक यादव, मोहसीन खान, के गौतम, शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम सिद्धार्थ, ॲश्टन टर्नर, मॅट हेन्री, अर्शद खान.
महेंद्रसिंग धोनी, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आरएस हंगेरकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, अरावेली अवनीश, डॅरिल मिचेल, रचिन रवींद्र, मिचेल. सँटनेर, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथिसा पाथिराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकूर, महेश तिक्षाना आणि समीर रिझवी.