विराटआधी Gautam Gambhir नं धोनीलाही डिवचलेलं? Team India तील खेळाडूचा गौप्यस्फोट

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या IPL 2023 च्या एका सामन्यामध्ये गौतम गंभीर आणि विराट कोहली या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर क्रिकेट विश्वातून आणखी एक गौप्यस्फोट झाला आहे.

Updated: May 5, 2023, 10:54 AM IST
विराटआधी Gautam Gambhir नं धोनीलाही डिवचलेलं? Team India तील खेळाडूचा गौप्यस्फोट  title=
IPL 2023 news Gautam Gambhir Mahendra Singh Dhoni ego clashes

Gautam Gambhir Virat Kohli Clash : सध्या सुरु असणाऱ्या आयपीएल स्पर्धेमध्ये खेळाडूंच्या कामगिरीसोबतच हे पर्व गाजतंय ते म्हणजे तिथं धुमसणाऱ्या बऱ्याच वादांमुळं. खेळाडूंमध्ये आपआपसांत असणारे मतभेद थेट क्रिकेटच्या मैदानातच समोर आल्यामुळं आता कोणाचा खरा वैरी कोण, यावरून पडदा उठला आहे. निमित्त ठरलं ते म्हणजे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील बाचाबची.

विराट आणि गौतम या दोघांमध्येही सारंकाही आलबेल नाही ये यापूर्वीही पाहायला मिळालं. कारण, गंभीरनं कायमच वक्तव्यांच्या माध्यमातून विराटवर निशाणआ साधला. विराट मात्र त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आला नाही. हो, पण ही ठिणगी मात्र केव्हापासूनच धुमसत होती. अखेर लखनऊ विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यात या ठिणगीचा वणवा झालाच.

आणखीही काही खेळाडूंशी गंभीरनं घेतलेला पंगा...

आता तुम्ही म्हणाल विराट आणि गौतमचा वाद मोठाच होता. पण, मुळात तसं नाहीये. कारण आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये त्यानं इतरही खेळाडूंशी हुज्जत घातल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये महेंद्रसिंह धोनीसह इतरही खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. टीम इंडियातील माजी खेळाडू इरफान पठान यानंच याबाबतचा गौप्यस्फोट केला.

‘त्या’ वादाला आठवत इरफान म्हणाला....

बुधवारी चेन्नई आणि लखनऊ यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाल्यानंतर प्रेझेंटर म्हणून इरफाननं ते दिवस आठवले जेव्हा गंभीरकडे Kolkata knight riders या संघाचं कर्णधारपद होतं. 2016 मध्ये त्याचा संघ त्यावेळी धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सविरोधात मैदानात उतरला होता. त्यावेळी माहीला रोखण्यासाठी गंभीरनं रणनिती आखली होत, जी बऱ्याच अंशी प्रभावी ठरली.

हेसुद्धा पाहा : चंद्रग्रहणासोबतच आज आभाळात दिसणार रहस्यमयी Flower Moon; समजून घ्या याचा अर्थ

गंभीरनं नेमकं काय केलं? याबाबत सांगताना धोनी जेव्हाजेव्हा फलंदाजीसाठी मैदानात येत होता तेव्हातेव्हा Gautam Gambhir कसोटी क्रिकेटसारखी Fielding लावत होता. यावेळी तो सुनील नरीन, पियुष चावला या खेळाडूंना गोलंदाजीसाठी उतरवत होता. तेव्हा प्रत्येकवेळई माही बाल झाला होता, असं तो म्हणाला.

कोलकाता संघाच्या कर्णधारपदी असताना गंभीरनं कायमच माहीच्या अहंकाराचा धक्का दिला आहे. तो एक असा खेळाडू होता ज्यानं अनेक वर्षे माहिच्या डोक्याचा ताप वाढवला होता. असं म्हणत गंभीरनं शांत राहूनही कशा प्रकारं माहिला डिवचलं होतं हा प्रसंग क्रिकेटप्रेमींसमोर आला. या साऱ्यावर माहिची काय प्रतिक्रिया असेल हे तुम्हालाही ठाऊक आहे. म्हणूनच की काय, त्यांच्यातला दुरावा चव्हाट्यावर आला नाही.