लखनऊच्या संघाकडून 12 खेळाडू मैदानात? IPL 2023 मुंबईसोबत रडीचा डाव

IPL 2023 : आता संघाला पुढे जाण्यासाठी दुसऱ्या संघांच्या आकडेवारीवर लक्ष ठेवावं लागणार. हे तर, 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...' असंच काहीसं झालं आहे. का? पाहा ही बातमी...  

सायली पाटील | Updated: May 17, 2023, 02:36 PM IST
लखनऊच्या संघाकडून 12 खेळाडू मैदानात? IPL 2023 मुंबईसोबत रडीचा डाव title=
IPL 2023 LSG vs MI Highlights Lucknow Super Giants smashed Mumbai indians

IPL 2023 : आयपीएलचं यंदाचं पर्व आता अंतिम टप्प्याच्या दिशेनं पुढे जातना दिसत आहे. यामध्ये आता प्रत्येक संघ आपल्या वाट्याला आलेल्या संधीचं सोनं करताना दिसत आहे. हातची संधी जाऊन द्यायचीच नाही, असं म्हणत संघ प्रशिक्षक आणि खेळाडू जीव ओतून खेळाचं प्रदर्शन करताना दिसत आहेत. लखनऊ येथील Ekana Cricket Stadium मध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात याचीच प्रचिती आली. जिथं यजमान संघानं मुंबई इंडियन्सना 5 धावांनी नमवलं. (IPL 2023 LSG vs MI Highlights Lucknow Super Giants smashed Mumbai indians )

अखेरच्या क्षणापर्यंत कोणता संघ जिंकणार याबाबतचं चित्र स्पष्ट झालं नसल्यामुळं सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगत गेला. रोहित शर्मानं सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुख्य म्हणजे लखनऊच्या संघानं मुंबईला मागल वर्षीही धूळ चारली आणि त्याचीच पुनरावृत्ती मंगळवारच्या सामन्यातही पाहायला मिळाली. 

लखनऊच्या वतीनं मैदानात 12 खेळाडू? 

मुंबईच्या संघाला नमवत लखनऊनं आयपीएलमध्ये आगेकूच केली आहे. तर, अंबानींच्या मालकीचा मुंबई संघ मात्र आता गंटांगळ्या खातना दिसत आहे. कारण, साखळी फेरीतला आणखी एक सामना मुंबईनं गमावला तर विजेतेपदाच्या स्वप्नाचा विचारच सोडावा लागेल. इतकंच काय, तर आता रोहित शर्माच्या या पलटनचं भविष्य दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. 

एकिकडे मुंबईच्या संघाला काही अंशी नशिबाची साथ नाही, असंच म्हटलं जात असतानाच दुसरीकडे विरोधी संघांकडून केला जाणारा कावेबाजपणाही संघाच्या वाटेत अडथळे निर्माण करताना दिसत आहे. हे आम्ही नाही, तर क्रिकेटप्रेमीच म्हणत आहेत. LSG vs MI सामन्यादरम्यान, नियमाप्रमाणं प्रत्येक संघाचे 11 खेळाडू मैदानात असणं अपेक्षित होतं. पण, लखनऊच्या वतीनं मात्र 12 खेळाडू मैदानात आल्याचं अनेकांनीच म्हटलं. काही क्षणांसाठी तर, हा फुटबॉलचा सामान आहे असंच वाटू लागलं. कारण, तिथं ज्याप्रमाणं मैदानात सीमारेषेपलीकडून प्रशिक्षकांचे इशारे आणि मार्गदर्शन सुरु असतं त्याचप्रमाणं लखनऊच्या संघाला गौतम गंभीर डगआऊटमधून मार्गदर्शन करताना दिसला. 

हेसुद्धा वाचा : LSG vs MI: बाप दवाखान्यात अन् इकडं पोराने मैदान मारलं, पलटणला नडणारा Mohsin Khan आहे तरी कोण?

 

लखनऊच्या संघातील या 12 व्या खेळाडूनं मैदानावर येत कधी कमाल केली हे मुंबईच्या खेळाडूंना लक्षातही आलं नाही. किंबहुना पंचांच्याही ही बाब लक्षात आली नाही. बरं, आणखी मोठी गोष्ट म्हणजे खेळाडूंना पाणी नेणाऱ्या खेळाडूंकडे गंभीर काही संदेश पाठवत होता. हे सर्वकाही क्रिकेटप्रेमींनी पाहिलं. यजमान संघाला सामन्यात त्यांच्या चाहच्यांचा पाठिंबा मिळाला असला तरीही, टीव्हीवरून किंवा मोबाईलवरून सामना पाहणाऱ्यांनी मात्र लखनऊच्या संघाची ही अदृश्य खेळी पाहिली आणि संघानं चिडीचा डाव केल्यासा सूर या मंडळींनी आळवला. तुम्ही हा सामना पाहिला का? तुम्हाला या गोष्टी जाणवल्या?