IPL 2023: IPL मध्ये नेट बॉलर्सना किती पैसे मिळतात? आकडा ऐकून व्हाल थक्क

भारतासोबत इतर इंटरनॅशनल टीम्स त्यांच्या नेट बॉलर्सना बोलवतात. मात्र तुम्हाला माहितीये का की, नेट बॉलर्सना किती फी दिली जाते. चला तर मग जाणून घेऊया की, नेट बॉलर्सना किती पैसे दिले जातात.

Updated: Mar 29, 2023, 06:45 PM IST
IPL 2023: IPL मध्ये नेट बॉलर्सना किती पैसे मिळतात? आकडा ऐकून व्हाल थक्क title=

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16 व्या सिझनची क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागली आहे. येत्या 31 मार्चपासून म्हणजे अगदी 2 दिवसांनी आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. यावेळी पहिला सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यामध्ये रंगणार आहे. 16 व्या सिझनसाठी सर्व टीम तयार असून टीम्सने त्यांच्या होम टाऊनमध्ये ट्रेनिंग कॅम्प देखील लावले आहेत. या ट्रेनिंग कॅम्पमध्ये प्रॅक्टिससाठी नेट बॉलर्सना बोलण्यात येतं. 

भारतासोबत इतर इंटरनॅशनल टीम्स त्यांच्या नेट बॉलर्सना बोलवतात. मात्र तुम्हाला माहितीये का की, नेट बॉलर्सना किती फी दिली जाते. चला तर मग जाणून घेऊया की, नेट बॉलर्सना किती पैसे दिले जातात.

किती फी आकारतात नेट बॉलर्स

आयपीएलमध्ये खेळाडूंना किती फी द्यायची हे ऑक्शन आणि कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून ठरवलं जातं. मात्र नेट बॉलर्सना किती पैसे दिले जातात, याबाबत फार कमी लोकांना माहिती असेल. मात्र कदाचित तुम्ही ऐकून हैराण व्हाल की, नेट बॉलर्सना फी आकारली जात नाही.  

कोरोनाच्या अगोदर नेट बॉलर्सना कोणत्याही प्रकारली फी दिली जात नव्हती. मग ते नेट बॉलर्स टीम इंडियासाठीचे असतील किंवा आयपीएलसाठीचे. मात्र कोरोनाच्या प्रोटोकॉल्स दरम्यान नेट बॉलर्सना बायो-बबल्समध्ये ठेवावं लागत होतं. त्यावेळी नेट बॉलर्सना 5 लाख रूपये फी दिली जात होती. 

कोरोनानंतर नेट बॉलर्सना फी देणं बंद

मात्र कोरोनानंतर नेट बॉलर्सना पुन्हा एकदा फी देणं बंद झालं. यामध्ये टीम ज्या शहरांमध्ये सामने खेळते, त्या ठिकाणी लोकल बॉलर्सना खेळवलं जातं. मात्र नेट बॉलर्स ठेवण्याचे देखील काही नियम असल्याचं माहिती आहे. जर फ्रेंचायझींना नेट बॉलरची गरज असेल आणि टीम मॅनेजमेंटने स्पेशल  नेट बॉलरला बोलवून घेतलं तर त्याला दररोज सुमारे 7,000 रुपये देण्यात येतात.

यामध्ये नेट बॉलर्सना मोठा फायदा मिळतो. कारण यावेळी त्यांच्या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. याशिवाय या गोलंदाजाला खूप काही शिकायला देखील मिळतं.