मुंबई : क्रिकेट चाहते कायम आयपीएलची (IPL) आवर्जुन वाट पाहत असतात. या आयपीएलच्या 16 व्या मोसमासाठी (Ipl 2023) डिसेंबरमध्ये मिनी ऑक्शन (IPL 2023 Mini Auction) पार पडणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. स्टार विकेटकीपर बॅट्समनने आयपीएलच्या 16 व्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या क्रिकेटरने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
(ipl 2023 england batsman and wicketkeeper sam billing will not played 16 season for longer format cricket csk kkr)
इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन सॅम बिलिंग्सने (Sam Billings) एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी आयपीएलच्या या मोसमात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बिलिंग्सने आयपीएलच्या 15 व्या मोसमात केकेआरकडून (KKR) 8 सामन्यात खेळताना 169 धावा केल्या होत्या. बिलिंग्सने 2016 मध्ये आयपीएल डेब्यू केला होता. बिलिंग्सने चेन्नईचंही (CSK) प्रतिनिधित्व केलं आहे.
"मी एक कठोर निर्णय घेतला आहे. मी आयपीएलचा पुढील हंगाम खेळणार नाही. इंग्लंडमध्ये उन्हाळ्यात कँटसाठी क्रिकेट खेळण्याकडे लक्ष द्यायचं आहे. मला संधी देण्यासाठी मी कोलकाताचा आभारी आहे. केकेआरसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा मी आनंद लुटला. भविष्यात मी पुन्हा तुमच्यासाठी खेळेन अशी आशा आहे", असं ट्विट सॅमने केलंय.
Thank you so much for the opportunity @kkriders ! Loved every minute of it. An amazing franchise with some brilliant people.
Hopefully see you again in the future pic.twitter.com/hxVVXfRqEE
— Sam Billings (@sambillings) November 14, 2022
दरम्यान सॅमने आतापर्यंत आयपीएलमध्ये 30 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 503 धावा केल्या आहेत. तसेच सॅम विकेटकीपिंगही जबरदस्त करतो.