MS Dhoni Six Video: इंडियन प्रिमियर लिगच्या यंदाच्या सिझनमधील (IPL 2022) पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सविरुद्धच्या (Gujarat Giants) सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) संघाने 178 धावा केल्या आहेत. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने तुफान फटकेबाजी केली. तर शेवटच्या षटकामध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने दोन उत्तम फटके लगावत चाहत्यांची मनं जिंकली. धोनीने आधी एक उत्तुंग षटकार लगावला आणि त्यानंतर लेग साईडला चौकार मारला. धोनीने षटकार लगावताच गुजरातच्या होम ग्राऊण्डवर उपस्थित जवळजवळ सर्वच चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
सामन्यातील 18 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संघाची धावसंख्या 153 वर असताना रविंद्र जडेजा बॉण्ड्रीवर झेलबाद झाला. जडेजाच्या रुपाने चेन्नईचा सहावा फलंदाज तंबूत परतला. मात्र चेन्नईच्या संघाची ही विकेट पडल्यानंतर चेन्नईच्याच चाहत्यांनी मोठा जल्लोष केल्याचं उलटं चित्र मैदानात पहायला मिळालं. चेन्नईच्या चाहत्यांनी आपला खेळाडू बाद झाल्यानंतर सेलिब्रेशन करण्याचं कारण ठरला महेंद्र सिंग धोनी! जडेजा बाद झाल्यानंतर डगआऊटमध्ये पॅड आणि हेल्मेट घालून बसलेला धोनी फलंदाजीसाठी बॅट हातात घेऊन उभा राहिला आणि मैदानात चाहत्यांनी एकच जल्लोष केला. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
MS Dhoni entry in #ipl2023 #dhoni #cskvsgt #iplopeningceremony pic.twitter.com/L6KxiLlZIj
— Anant Jangde (@infinityjangde) March 31, 2023
सामनाच्या शेवटच्या षटकामध्ये आयर्लंडचा वेगवान जोशुआ लिटीलच्या गोलंदाजी करत होता. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनीने लेग साईडला उत्तुंग षटकार लगावला आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या फलंदाजीची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये कायम आहे. याचाच प्रत्यय त्याने लगावलेल्या या षटकारानंतर आला. पुढच्याच चेंडूवर धोनीने लेग साईडलाच एक चौकार लगावला. धोनीने या खेळीमध्ये 7 चेंडूमध्ये नाबाद 14 धावा केल्या.
1)
MS DHONI IS BACK LADIES AND GENTLEMAN!!! THE GOAATT#GTvsCSK | #cskvsgtpic.twitter.com/Ru5rHXtdio
— Sexy Cricket Shots (@sexycricketshot) March 31, 2023
2)
Ms Dhoni hitting boundaries is giving me old 2019 mahi's vibe#MSDhoni #Ipl2023 #GTvsCSK pic.twitter.com/u5F5lcFTuo
— (@AchajiOk) March 31, 2023
3)
That's MS Dhoni at the age of 42.
Thala Thala Dhaaan! pic.twitter.com/8DJIoZfYRd— (@pitchinginline) March 31, 2023
4)
This part of my life = happiness
Ms dhoni u goat pic.twitter.com/LqfziTK1IX— (@cricloverPrayas) March 31, 2023
दरम्यान, या सामन्यामध्ये ऋतुराजने तुफान फटकेबाजी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात मोलाचं योगदान दिलं. ऋतुराज 92 धावांवर बाद झाला. ऋतुराजने 9 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने अवघ्या 50 चेंडूंमध्ये या 92 धावा केल्या.