IPL 2023 : आयपीएलच्या तोंडावर 'या' संघाला मोठा धक्का, कोटींची बोली लागलेला खेळाडू पूर्ण हंगामातून बाहेर

IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम येत्या 31 मार्चपासून सुरु होत आहे. सर्व टीम स्पर्धेसाठी सज्ज झाल्या असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोटींची बोली लागलेला खेळाडूने अचानक स्पर्धेतून माघार घेतली आहे. 

Updated: Mar 23, 2023, 06:29 PM IST
IPL 2023 : आयपीएलच्या तोंडावर 'या' संघाला मोठा धक्का, कोटींची बोली लागलेला खेळाडू पूर्ण हंगामातून बाहेर title=

IPL 2023 Jonny Bairstow Ruled out: भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका (India vs Australia ODI Series) संपली असून आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची (IPL 2023). येत्या 31 मार्चपासून आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होत आहे. 31 मार्च ते 28 मे म्हणजे तब्बल 52 दिवस ही स्पर्धा खेळली जाणार असून आयपीएलच्या ट्रॉफीसाठी दहा संघांमध्ये चुरस रंगणार आहे. आयपीएलसाठी सर्वच संघ सज्ज झाले असून रणनितीही तयार झाली आहे. पण आयपीएलच्या तोंडावर एक मोठी माहिती समोर आली आहे. कोटी रुपये खर्चून संघात घेतलेला खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. 

पंजाब किंग्सला मोठा धक्का
इंग्लडंचा धडाकेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) पायाच्या दुखापतीमुळे (Injury) त्रस्त आहे. त्यामुळे त्याला इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यामुळे बेअरस्टो आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे पंजाब किंग्सला स्पर्धेआधीच मोठा धक्का बसला आहे. त्यातल्या त्यात पंजाबसाठी एक समाधानाची गोष्ट म्हणजे अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सारवरत लिव्हिंगस्टोनने पुनरागम केलं आहे. 

कोट्यवधींची लावली होती बोली
डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात जॉन बेअरस्टोवर कोट्यवधींची बोली लागली. अखेर पंजाब किंग्सने (Punjab Kings) तब्बल 6.75 ची बोली लावत बेअरस्टोला आपल्या संघात घेतलं. पण दुखापतीमुळे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (England and Wales Cricket Board) आयपीएलमध्ये भाग घेण्यची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आयपीएलचा पूर्ण हंगाम बेअरस्टो खेळू शकणार नाी. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गोल्फ खेळताना पडल्याने बेअरस्टोच्या पायाला दुखापत झाली होती. टी20 वर्ल्ड कपमध्येही तो खेळू शकला नव्हता. 

कोलकाता नाईट रायडर्सलाही धक्का
पंजाब किंग्सबरोबरच कोलकाता नाईट रायडर्सलाही मोठा धक्का बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) प्रमुख खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे पूर्ण हंगाम खेळू शकणार नाहीए. श्रेय्यस अय्यर पाठिच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. नुकत्याच झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतही तो सहभाग घेऊ शकला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. ज्यामुळे तो बराच काळ संघातून बाहेर राहू शकतो. इतकंच काय तर जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे.