IPL 2023 : आयपीएलदरम्यान मोठी बातमी, वेळापत्रकात बदल करण्याचा बीसीसीआयचा निर्णय

IPL 2023: आयपीएल स्पर्धेला सुरुवात होऊ आता जवळपास 18 दिवस झाले आहेत. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. एका सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

Updated: Apr 17, 2023, 10:16 PM IST
IPL 2023 : आयपीएलदरम्यान मोठी बातमी, वेळापत्रकात बदल करण्याचा बीसीसीआयचा निर्णय title=

LSG vs CSK IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला 31 मार्चपासून सुरु झाले आणि गेल्या 18 दिवसात 24 सामने खेळवण्यात आले आहेत. यात एकाहून एक चुरशीचे सामने पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळतेय. यादरम्यान क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएलसंदर्भात (IPL 2023) एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये 4 मे रोजी होणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या सामन्याच्या वेळापत्रकात (IPL Scheduled) मोठा बदल करण्यात आला आहे. हा सामन लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअमवर (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. 

सामन्याच्या वेळापत्रकात बदल
आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील 46 वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान (Chennai Super Kings) खेळवला जाणार आहे. 4 मे रोजी दुपारी साडेतीन वाजता हा सामना खेळवला जाणार होता. पण त्याच दिवशी लखनऊमध्ये स्थानिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे कायदा आणि सुरक्षेचा विचार करता हा सामना 4 मे ऐवजी 3 मे रोजी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण बीसीसीआयने (BCCI) दोन्ही संघांना वेळेबाबत माहिती दिली आहे. 

लखनऊ नगर पालिका निवडणूक
4 मे रोजी लखनऊ नगर पालिका निवडणुका (Lucknow Municipal Elections) होणार आहेत. त्यामुळे जास्तीची सुरक्षा मतदान केंद्रावर तैनात केली जाणार आहे. अशात सामन्यादरम्या सुरक्षा कमी पडू शकते. तसंच सामन्यामुळे मतदान कमी होऊ शकतं, हे लक्षात घेता एलएसजी आणि सीएसके दरम्यानचा सामना 3 मे रोजी दुपारी साडेतीन वाजता खेळवला जाईल. 

सीएसकेचा संघ
एमएस धोनी (कर्णधार), बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, दीपक चाहर, मोईन अली, शिवम दूबे, मिचेल सेंटनर, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रीटोरियस, सिसांदा मगाला, डेवोन कॉनवे, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, प्रशांत सोलंकी, महेश ठीकशाना, अजिंक्य रहाणे, शेक रशीद, सुभ्रांशु सेनापति, निशांत सिंधु, अजय मंडल, भगत वर्मा, सिमरनजीत सिंह

LSGचा संघ
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रवि बिश्नोई, मोहसिन खान, मनन वोहरा, मयंक यादव, आवेश खान, यश ठाकुर, मार्कस स्टोइनिस, डेनियल सॅम्स, काइल मेयर्स, दीपक हुड्डा, करण शर्मा, प्रेरक मांकड, स्वप्निल सिं , के गौतम, आयुष बडोनी, कृनाल पांड्या, निकोलस पूरन, जयदेव उनादकट, रोमारियो शेफर्ड, अमित मिश्रा, नवीन-उल-हक, युद्धवीर चरक