IPL 2023 Auction: 87 खेळाडूंसाठी 10 टीम भिडणार, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?

TATA Indian Premier League Mini Auction : मेगा लिलावात (IPL) 405 खेळाडू मैदानात असतील. 405 क्रिकेटपटूंपैकी 273 भारतीय खेळाडू आहेत, तर 132 परदेशी खेळाडू लिलावामध्ये असतील.

Updated: Dec 22, 2022, 07:05 PM IST
IPL 2023 Auction: 87 खेळाडूंसाठी 10 टीम भिडणार, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक? title=
IPL 2023 Auction

IPL 2023 Auction: पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी उद्या म्हणजेच 23 डिसेंबर रोजी मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) पार पडणार आहे. कोचीमध्ये (Kochi) हा लिलाव होणार आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमी लिलाव कार्यक्रमाची (TATA Indian Premier League Mini Auction) आतुरतेनं वाट पाहत असल्याचं दिसतंय. अशातच आता आयपीएलच्या 10 संघाचे व्यवस्थापक सदस्य तयारीला लागले आहेत. मिनी लिलावात सिलेक्टर्स (IPL Team selectors) अनेक तरूण खेळाडूंवर बोली लावणार असल्यानं सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (ipl 2023 auction 87 players will sold for 10 teams read which teams have how much money left)

मेगा लिलावात 405 खेळाडू मैदानात असतील. 405 क्रिकेटपटूंपैकी 273 भारतीय खेळाडू आहेत, तर 132 परदेशी खेळाडू लिलावामध्ये असतील. 132 पैकी फक्त 30 खेळाडू सिलेक्ट होणार आहेत. लिलावात अफगाणिस्तानचा अल्लाह मोहम्मद गझनफर हा सर्वात तरूण खेळाडू असणार आहे. त्यामुळे संघ समिती तरुण खेळाडूंना संधी देणार की नाही?, असा सवाल उपस्थित होतोय.

लिलावासाठी आता कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक आहे ते पाहूया...

कोलकाता नाईट रायडर्सकडे (Kolkata Knight Riders) 7.05 कोटी शिल्लक आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूकडे (Royal Challengers Bangalore) 8.75 कोटी रक्कम शिल्लक आहे. मागील वर्षी फायनलमध्ये प्रवेश मिळवलेल्या राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) खिश्यात 13.2 कोटी आहेत. गतविजेत्या गुजरात टायटन्सकडे (Gujarat Titans) 19.25 कोटी असल्याने गुजरातचा संघ आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

दिल्लीची (Delhi Capitals) गाडी रुळावर येण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. दिल्ली कॅपिटल्सकडे (Delhi Capitals) 19.45 कोटी आहेत. तर चेन्नई सुपर किंग्जकडे (Chennai Super Kings) 20.45 कोटी असल्याने धोनी कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सनरायजर्स हैदराबादकडे (Sunrisers Hyderabad) 42.25 कोटींचा पेटारा बाकी आहे.

आणखी वाचा - IPL 2023 Auction : 'ही' 5 नावं लक्षात ठेवा, यांच्यावर पडणार पैशांचा पाऊस?

दरम्यान, रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सकडे (Mumbai Indians) 20.55 कोटी शिल्लक असल्याने युवा फलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पंजाबच्या (Punjab Kings) झोळीत 32 कोटी असल्याने नवा कॅप्टन कोण असणार? यावर चर्चा होताना दिसते. तर 23.35 कोटी शिल्लक असलेल्या गंभीरच्या चाणाक्क्ष बुद्धीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) कोणते मासे जाळण्यात खेचणार यावर नजरा असतील.