कोणाला संधी कोणाला डच्चू? जाणून घ्या IPL 2022 Retention LIVE Streaming कधी आणि कुठे पाहता येणार

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला आता अवघे काही महिने राहिले आहेत. या 15 व्या पर्वात 2 नवे संघ सहभागी होणार 

Updated: Nov 30, 2021, 05:47 PM IST
कोणाला संधी कोणाला डच्चू? जाणून घ्या IPL 2022 Retention LIVE Streaming कधी आणि कुठे पाहता येणार title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला आता अवघे काही महिने राहिले आहेत. या 15 व्या पर्वात 2 नवे संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे एकूण 10 संघ आमनेसामने भिडणार आहेत. यामुळे यंदा क्रिकेट चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या मोसमासाठी तयारी सुरु झाली आहे. रिटेंशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जानेवारी महिन्यात मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आगामी मोसमासाठी खेळाडू रिटेन (कायम) करण्याची आजची (30 नोव्हेंबर) शेवटची तारीख आहे. (ipl 2022 retention live streaming see where and when to watch retained and relesed player list in marathi) 

नियमानुसार, एकूण 8 फ्रँचायजीना प्रत्येकी 4 खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवता येणार आहे. नियमानुसार एका टीमला 3 भारतीय आणि 2 पेक्षा अधिक परदेशी खेळाडूंना रिटेन करता येणार नाही. त्याआधी आज आयपीएल रिटेंशन प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया कुठे आणि कधी पाहता येणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. 

रिटेंशन केव्हा होणार? 

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं रिटेंशन प्रक्रिया ही आज 30 नोव्हेंबरला पार पडणार आहे. 

रिटेंशन प्रक्रिया किती वाजता सुरु होणार? 

भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजता रिटेंशनला सुरुवात होणार आहे. 

कुठे पाहता येणार? 

संपूर्ण रिटेंशन हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही पाहता येईल. 

15 व्या मोसमात 10 संघ 

आयपीएलच्या 15 व्या मोसमात लखनऊ आणि अहमदाबाद हे 2 नवे संघ सहभागी होणार आहेत. सध्याचे 8 संघांनी खेळाडू रिटेन करतील. त्यानंतर या दोन्ही संघांना जास्तीत जास्त 3 खेळाडू निवडण्याची संधी मिळेल. या दोन्ही फ्रँचायजी 25 डिसेंबरला संघात घेतलेल्या खेळाडूंबाबत माहिती दणार आहे. या दोन्ही फ्रँचायजी 2 भारतीय आणि 1 परदेशी खेळाडू आपल्या संघात घेऊ शकतात.