मुंबई : महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या तोंडावर कॅप्टन्सी सोडली. धोनीनंतर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. धोनीने नेहमीप्रमाणे अचानक भयानक नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेत चाहत्यांना धक्का दिला. धोनीच्या या निर्णयानंतर एकच आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तसेच अनेक दिग्गज खेळाडूंनीही प्रतिक्रिया दिली. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) धोनीसाठी एक भावूक पोस्ट केलीय. (ipl 2022 rcb and team india former captain virat kohli wrote emotional post after ms dhoni quit captaincy)
विराटने काय म्हटलय?
विराटने धोनीसोबतचा आयपीएल सामन्यातला मैदानात मिठी मारतानाचा एक फोटो ट्विट केलाय. "पिवळ्या जर्सीत शानदार कर्णधारपदाचा शेवट. कर्णधारपदाचा असाच एक अध्याय ज्याला क्रिकेट चाहते कधी विसरणार नाहीत. तुमच्याबद्दल नेहमीच आदर राहिल", असं विराटने म्हटलंय.
कॅप्टन म्हणून जाडेजाची पहिली वेळ
रवींद्र जाडेजा आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कॅप्टन्सी करणार आहे. जाडेजाने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने राजस्थानकडून पदार्पण केलं होतं. त्यानंतर जाडेजा चेन्नई, गुजरात आणि कोच्चीकडूनही खेळला आहे. मात्र त्याला कधी नेतृत्वाची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता जाडेजा कॅप्टन म्हणून कशी कामगिरी करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Legendary captaincy tenure in yellow skip. A chapter fans will never forget. Respect always. @msdhoni pic.twitter.com/cz5AWkJV9S
— Virat Kohli (@imVkohli) March 24, 2022