IPL 2022: पंजाबच्या खेळाडूंवर बॉलिवूडचा फिव्हर; डायलॉग्जचे Video पाहून हसू आवरणार नाही

आयपीएलचे (IPL 2022) सामने आता अंतिम टप्प्यात पोहोचलेत. सर्वच टीम प्लेऑफच्या (Playoff)शर्यतीत पोहोचण्यासाठी चढाओढ करत असताना, मात्र पंजाबचे खेळाडू बॉलिवूड सिनेमातील डायलॉग मारून फॅन्सचे मनोरंजन करताना दिसत आहेत.

Updated: May 11, 2022, 05:02 PM IST
IPL 2022: पंजाबच्या खेळाडूंवर बॉलिवूडचा फिव्हर; डायलॉग्जचे Video पाहून हसू आवरणार नाही title=

मुंबई : आयपीएलचे (IPL 2022) सामने आता अंतिम टप्प्यात पोहोचलेत. सर्वच टीम प्लेऑफच्या (Playoff)शर्यतीत पोहोचण्यासाठी चढाओढ करत असताना, मात्र पंजाबचे खेळाडू बॉलिवूड सिनेमातील डायलॉग मारून फॅन्सचे मनोरंजन करताना दिसत आहेत.

पंजाबचे खेळाडू मैदानातील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेर चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करताना दिसत आहेत.  पंजाब किंग्जने (Punjab kings)  आपल्या खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओत पंजाबचे खेळाडू सलमान खान (Salman Khan),शाहरूख खानचे डायलॉग मारताना दिसतायत.  

पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू बेनी हॉवेलने शाहरूख खानच्या (Shahrukh khan)दिलवाले दुल्हनिया चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवला आहे. 'बड़े देश में ऐसी छोटी-छोटी चीजें होती रहती है, सेनोरिटा', असा डायलॉग हिंदी भाषेतून मारला आहे.  

दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडाने (Kagiso Rabada)देखील सलमान खानचा 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, फिर मैं अपने बाप की भी नहीं सुनता' हा डायलॉग मारलाय. तर  

पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू ओडियन स्मिथ सनी देओलच्या 'तारीख पे तारीख तारीख पे तारीख' हा डायलॉग मारलाय. पंजाब किंग्जच्या परदेशी खेळाडूंनी अशाप्रकारे चाहत्यांना खळखळून हसवले.

यंदाच्या हंगामात पंजाब किंग्ज संघाची कामगिरी तितकीशी चांगली झाली नाही. 11 सामन्यात पंजाबने 5 सामने जिंकले आहेत, तर 6 सामन्यात पराभव झालाय. त्यामुळे आता पंजाबचा खेळाडू प्लेऑफमध्ये दाखल होतो का ? हे येत्या सामन्यात कळणार आहे.