महेंद्रसिंह धोनी-विराट नाही तर या भारतीय क्रिकेटपटूचा फॅन ओडियन स्मिथ

ऑलराऊंडर खेळाडूनं पंजाबला दोनवेळा विजय मिळवून दिला. जेव्हा त्याल त्याच्या आवडत्या खेळाडूवर प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ओडियनचा आवडता खेळाडू महेंद्रसिंह धोनी किंवा विराट कोहली नाही. 

Updated: Apr 4, 2022, 11:54 AM IST
महेंद्रसिंह धोनी-विराट नाही तर या भारतीय क्रिकेटपटूचा फॅन ओडियन स्मिथ title=

मुंबई : पंजाब टीमची शान असलेल्या ओडियनची दोन सामन्यातील कामगिरी जबरदस्त होती. ऑलराऊंडर खेळाडूनं पंजाबला दोनवेळा विजय मिळवून दिला. जेव्हा त्याल त्याच्या आवडत्या खेळाडूवर प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ओडियनचा आवडता खेळाडू महेंद्रसिंह धोनी किंवा विराट कोहली नाही. 

 सचिन तेंडुलकर, सौरव गागुली, एमएस धोनी, विराट कोहली हे अनेक देशातील खेळाडूंचे फॅन आहेत. मात्र ऑलराऊंडर ओडियन यांचा फॅन नाही. त्याला टीम इंडियामधील दुसरा धडाकेबाज फलंदाज आवडतो. त्याने याबाबत वक्तव्य केलं आहे. 

मी रोहित शर्माचा फॅन आहे. तो सर्वात वेगानं खेळणारा फलंदाज आहे. त्याची ही कला मला फार आवडते. त्याचा स्वभाव अतिशय आक्रमक आहे. त्याची ही शैली मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय. मला तो खेळताना पाहायला आवडतं. मी अजूनही त्याच्याशी बोललो नाही. पण मला आशा आहे की आम्ही लवकरच बोलू.

ओडियन स्मिथला रोहित शर्माचा खूप मोठा फॅन आहे. रोहित शर्माने आपल्या फलंदाजीनेच नव्हे तर खेळाडूंनाही आपल्या स्टाईलनं वेड लावलं आहे. खेळाडूंनाही रोहित शर्माकडून फलंदाजीचे कौशल्य शिकायचे आहे आणि रोहितप्रमाणे खेळायचे आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 विजेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहितने आतापर्यंत 129 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. यापैकी मुंबई संघाने 75 जिंकले असून 50 पराभव स्वीकारावा लागला आहे. रोहितने 215 आयपीएल सामन्यांमध्ये 31.11 च्या सरासरीने 5662 धावा केल्या आहेत. ज्यात 1 शतक आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे.