IPL 2022: MI, RCB नंतर आता गुजरात संघाने जाहीर केली नवी जर्सी

IPL 2022 सुरु होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. चाहत्यांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक संघ नव्या जर्सीसह या सीजनमध्ये मैदानात उतरणार आहे.

Updated: Mar 13, 2022, 09:49 PM IST
IPL 2022: MI, RCB नंतर आता गुजरात संघाने जाहीर केली नवी जर्सी title=

IPL 2022 : आयपीएलची सुरुवात होण्यासाठी काही दिवस बाकी असताना नव्या गुजरात संघाने (Gujrat Titans jersey) आपली जर्सी जाहीर केली आहे. गुजरातची जर्सी गडद निळ्या आणि आकाशी रंगांनी बनलेली आहे. मात्र संघाच्या जर्सीवर इतर संघांप्रमाणे सिंह किंवा इतर कोणतेही चिन्ह नाही. बाजूला आकाशी रंगाचे हलके पट्टे असणार आहेत.

गुजरात संघाच्या आधी मुंबई, आरसीबी, पंजाब आणि दिल्लीच्या संघांनी त्यांची नवी जर्सी जाहीर केली आहे. यापैकी बहुतेक संघांच्या जर्सीवर सिंहाचे चिन्ह आहे.

Gujrat Titans ची जर्सी

Mumbai Indians ची जर्सी