मुंबई : डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) 15 ऑगस्ट 2020 ला महेंद्रसिंह धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर रैना आयपीएल (IPL) खेळण्यासाठी यूएईला गेला. पण त्याने आयपीएल सुरू होण्यापूर्वी बायो-बबलमधून बाहेर पडला. रैना वयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला. त्यानंतर रैना 2021 च्या मोसमात तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. मात्र यंदाच्या 15 व्या मोसमात रैना अनसोल्ड राहिला. (ipl 2022 mister ipl aka suresh raina will back in commentary box)
आयपीएलच्या 15 व्या मोसमात अनसोल्ड राहिल्याने रैनाने कॉमेंट्री करण्याचं ठरवलं. त्यानंतर रैना कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसला. पहिल्या काही सामन्यांमध्ये रैनाने कॉमेंट्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण काही सामन्यांनंतर तो कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसला नाही.
त्यामुळे रैना पुन्हा चेन्नईकडून खेळणार का, असं बोललं जात होतं. पण तसं नाही. त्याचा स्टार स्पोर्ट्ससोबतचा करार काही दिवसांचा होता. त्यामुळे त्याला कॉमेंट्री पॅनल सोडावं लागलं.
दरम्यान रैनाची पुन्हा एकदा आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे रैना पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून फटकेबाजी करताना दिसणार आहे. रैनाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. "तुम्हाला काय वाटतं आज रात्री कोण जिंकणार? माईक तयार आहे", असं ट्विट रैनाने केलंय.
Who do you think will win tonight. Ready for the day #IPL2022 #KKRvsRR pic.twitter.com/tQniJvXAiM
— Suresh Raina (@ImRaina) May 2, 2022