IPL 2022: रोहितचा हुकमी एक्का परतला, मुंबईच्या स्टार खेळाडूची टीममध्ये एन्ट्री

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला. 

Updated: Mar 31, 2022, 05:20 PM IST
IPL 2022: रोहितचा हुकमी एक्का परतला, मुंबईच्या स्टार खेळाडूची टीममध्ये एन्ट्री title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला.  आता मुंबई इंडियन्सला दुसऱ्या सामन्याआधी मोठी गूड न्यूज मिळाली आहे. मुंबईचा स्टार खेळाडू हा पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. (ipl 2022 mi sky suryakumar yadav fit and join mumbai indians squad)  

मुंबईचा युवा आणि घातक बॅट्समन सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरला आहे. सूर्याच्या अंगठीला दुखापत झाली होती. यानंतर आता सूर्या राजस्थान विरुद्धच्या सामन्याआधी टीमसोबत जोडला गेला आहे. मुंबई फ्रँचायजीने याबाबतची माहिती दिली आहे.

"सूर्यकुमारने आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर टीमसह जोडला गेला आहे. त्याने पोलार्ड, जसप्रीत बुमराह आणि इशान किशन यांच्यासोबत नेटमध्ये सरावही केला. सूर्याच्या उपस्थितीमुळे टीममध्ये उत्साहाचं वातावरण होतं", अशी माहिती टीम मॅनेजमेंटने दिली आहे.

सूर्याला विंडीज विरुद्धच्या मालिकेत अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर सूर्याने बंगळुरुतील एनसीएत स्वत:वर मेहनत घेतली आणि दुखापतीतून सावरला. त्यामुळे सूर्याला दिल्ली विरुद्ध 27 मार्चला झालेल्या सामन्यालाही मुकावं लागलं होतं. 

सूर्या आता पूर्णपणे सावरला आहे. यामुळे आता सूर्या कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.