मुंबई: माही हा सर्वांचा आवडता खेळाडू. नुकताच त्याने चेन्नई संघाला IPL ची चौथ्यांदा ट्रॉफी जिंकवून देण्याचा विक्रम केला आहे. आता महेंद्रसिंह धोनीनं CSK व्यवस्थापनाकडे एक विनंती केली आहे. या प्रस्तावावर धोनी ठाम आहे. धोनीच्या हट्टापुढे आता महेंद्रसिंह धोनीपुढे CSK व्यवस्थापनाला झुकावं लागणार असं चित्र आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने IPL 2021 चे विजेतेपद पटकावले. आतापर्यंत 9 आयपीएल फायनल खेळलेला हा संघ पुढील मोसमात पूर्णपणे वेगळा दिसू शकतो. त्याचे कारण म्हणजे IPL 2022 पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे.
या लिलावात CSK ला काही नवीन आणि मजबूत खेळाडूंवर बोली लावायची आहे. तसेच दोन संघ आणखी वाढल्यामुळे स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. या खेळाडूंमध्ये एक असा ऑलराऊंडर खेळाडू आहे जो धोनीला आपल्या संघात घ्यायचा आहे.
टीम इंडियासाठी टी 20 वर्ल्ड कपमध्ये फेल गेलेला हा खेळाडू धोनीला आपल्या संघात घ्यायचा आहे. यासाठी धोनी अडून बसला आहे. त्यामुळे धोनीच्या जिद्दीसमोर CSK मॅनेजमेंट झुकणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
CSK मध्ये पुढच्या हंगामात ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला संघात घेण्यासाठी धोनीचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील वर्षी मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला त्यांच्या संघातून वगळणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
या सगळ्या परिस्थितीत CSK संघाला ड्वेन ब्राव्होच्या जागी हार्दिकला CSK मध्ये घेतलं जाण्याची शक्यता आहे. जर खरंच पांड्या चेन्नई संघात गेला तर इतर संघांसाठी कडवी टक्कर देणारा संघ ठरू शकतो.
मुंबई संघाकडे रिटेन करण्यासाठी एकापेक्षा एक चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे कदाचित मुंबई संघ हार्दिक पांड्याला सोडण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, इशान किशन, सूर्यकुमार यादव, पोलार्ड सारखे उत्तम कामगिरी करणारे खेळाडू मुंबईकडे आहेत.