IPL 2022, KKR vs DC | वॉर्नर आणि पृथ्वीचा झंझावात, कोलकाताला विजयासाठी 216 धावांचे आव्हान

डेव्हिड वॉर्नरची (David Warner) फटकेबाजी आणि पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) 200 पार मजल मारली.  

Updated: Apr 10, 2022, 05:33 PM IST
IPL 2022, KKR vs DC | वॉर्नर आणि पृथ्वीचा झंझावात, कोलकाताला विजयासाठी 216 धावांचे आव्हान title=
छाया सौजन्य : डीसी ट्विटर

मुंबई : डेव्हिड वॉर्नरची (David Warner) फटकेबाजी आणि पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) 200 पार मजल मारली आहे. दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 216 धावांचे आव्हान दिले आहे. (ipl 2022 kkr vs dc delhi capitals set 216 runs target for kolkata knight riders)

दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 61 धावांची शानदार खेळी केली. तर युवा सलामीवीर पृथ्वीने 51 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या काही षटकांमध्ये शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल या दोघांनी फटकेबाजी केली. शार्दुल आणि अक्षरने अनुक्रमे नॉट आऊट 29 आणि 22 रन्स केल्या.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन | ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वार्नर, रोवमॅन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि खलील अहमद. 

कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग इलेव्हन  | श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम आणि वरुण चक्रवर्ती.