IPL मधील एकही सामना न खेळता पूर्ण सॅलरी घेणार 'हा' खेळाडू?

IPL मध्ये जेवढे सामने खेळले जातात त्याचीच सॅलरी मिळते, पण या खेळाडूला पूर्ण सॅलरी मिळण्याचं काय कारण?

Updated: Apr 17, 2022, 04:05 PM IST
IPL मधील एकही सामना न खेळता पूर्ण सॅलरी घेणार 'हा' खेळाडू? title=

मुंबई : आयपीएलआधी काही खेळाडूंनी माघार घेतली तर काही खेळाडू दुखापतीमुळे काही काळ बाहेर आहेत. आयपीएलमध्ये सगळे सामने खेळलेल्या खेळाडूंना पूर्ण पगार मिळतो. पण असा एक खेळाडू आहे ज्याला आयपीएलमध्ये एकही सामना न खेळताही पूर्ण पगार मिळण्याची शक्यता आहे. तो लकी खेळाडू कोण आणि त्यामागचं काय कारण जाणून घेऊया. 

चेन्नईचा स्टार खेळाडू दीपक चाहरला 14 कोटी देऊन फ्रान्चायझीने रिटेन केलं. दुखापतीमुळे दीपक चाहर आयपीएलचे सामने खेळू शकला नाही. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातून तो बाहेर झाला आहे. साधारण 12 आठवडे तो मैदानापासून दूर राहील अशी माहिती मिळाली आहे.

या सगळ्या गोष्टी असतानाही दीपक चाहरचा पगार न कापण्याचा निर्णय फ्रान्चायझीने घेतला आहे. दीपक चाहरला पूर्ण पगार मिळू शकतो. वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सामन्यात दीपक चाहरला दुखापत झाली. त्यानंतर तो एप्रिल अखेरपर्यंत फिट होऊन मैदानात परतेल अशी आशा होती. मात्र तो अजून पूर्ण फीट झाला नाही. 

दीपक चहर आयपीएलमधून बाहेर गेल्याचा मोठा फटका चेन्नईला बसला आहे.  या धक्क्याचा परिणाम स्पर्धेतील टीमच्या कामगिरीवरही दिसून येत आहे. पण, एवढे करूनही त्याला पूर्ण पगार मिळण्याची शक्यता आहे.

दीपकला पूर्ण पगार मिळू शकतो कारण त्याने स्वत: किंवा कोणत्याही वैयक्तिक कारणावरून आपले नाव मागे घेतले नाही. त्याच्या दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. याशिवाय, तो अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांचा बीसीसीआयशी वार्षिक करार आहे.