अबुधाबी : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders ) 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे. चेन्नईला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 धावेची गरज होती. दीपक चाहरने (Deepak Chahar) सिंगल काढत चेन्नईचा विजय झाला. या विजयासह चेन्नईने पॉइंट्सटेबलमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली आहे. (Ipl 2021 today 26 september match chennai super kings beat kolkata knight riders by 2 wickets on last ball)
रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) निर्णायक क्षणी 8 चेंडूत 2 चौकार आणि 2 षकारांच्या मदतीने 22 धावांची महत्तवपूर्ण खेळी केली. जाडेजाने ऐनवेळेस केलेल्या फटकेबाजीमुळे चेन्नईला विजय मिळवता आला. जाडेजा व्यतिरिक्त चेन्नईकडून सलामीवीर फॅफ डु प्लेसिसने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने 40 धावा केल्या. मोईन अलीने 32 रन्स केल्या.
तर कोलकाताकडून सुनील नारायणने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कोलकाताची बॅटिंग
दरम्यान त्याआधी कोलकाताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कोलकतााने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 45 रन्स चोपल्या तर नितीश राणाने नाबाद 37 धावांची खेळी केली. तसेच आंद्रे रसेलने 20 आणि दिनेश कार्तिकने नाबाद 26 धावांची छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली.
WHAT. A. MATCH!
Absolute scenes in Abu Dhabi as @ChennaiIPL win the last-ball thriller against the spirited @KKRiders. #VIVOIPL #CSKvKKR
Scorecard https://t.co/l5Nq3WwQt1 pic.twitter.com/Q53ym5uxtI
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021