मुंबई : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आयपीएलशी तसा काही संबंध नाही. किंवा ते बीसीसीआयच्या या लीगशी संबंधित कोणत्याही संघाचे कोच नाही किंवा त्यांची यामध्ये इतर कोणतीही भूमिका नाहीत. पण, ते सर्व सामने पाहत असतात. ते या सामन्यांचा मजा घेत घरी आरामात बसले आहेत, परंतु ते सगळ्या खेळाडूंच्या खेळावरही बारीक लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे आयपीएलच्या 14 व्या सीझनमध्ये कोण बाजी मारेल? याचे आकलन ही ते घरी बसुन करत आहेत.
आयपीएल 2021 अद्याप पहिल्या टप्प्यात आहे. त्यामुळे इतक्या लवकर काहीही सांगण्याची किंवा काही भाकित करण्यासाठी तशी थोडी घाईच होईल. पण, रवि शास्त्रींना हे सर्व स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच त्यांनी आधीच आयपीएल 2021 चा विजेता कोण होणार हे सांगितले आहे.
रवी शास्त्री यांचे शास्त्र सांगतात की, या वेळी कोणताही जुना संघ जिंकणर नाही तर, एक नवीन संघ आयपीएल 2021 ची ट्रॅाफी घेणार आहे. तसे शास्त्री यांनी त्या नवीन संघाचे नाव घेतले नाही, परंतु त्यांनी आपल्या ट्विटसह जो फोटो पोस्ट केला आहे, ते पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, त्यांचा इशारा कोणत्या दिशेने आहे.
Brilliant game last night. Seeds being sowed for a potentially new winner to emerge #IPL2021 @IPL pic.twitter.com/A0RKnI0y4S
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) April 28, 2021
शास्त्रींच्या ट्वीटनुसार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2021 चा नवा विजेता ठरू शकेल. त्यासाठी त्याने सुरवात केली आहे. त्याने आपल्या पहिल्या 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत. या आकडेवारीच्या आधारे ते विराट अँन्ड कंपनीला आयपीएल 2021 लीगचे विजेता मानत आहेत.
आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवल्यानंतर रवि शास्त्री यांनी हे ट्वीट केले. हा सामना आरसीबीने 1 धावांच्या म्हणजे अगदीच थोड्या फरकाने जिंकला आहे, ज्याचे शास्त्रीने एक मोठा सामना म्हणून वर्णन केले आहे.