मुंबई : भारतात यावर्षी आयसीसी टी -20 वर्ल्डकप होणार आहे. प्री-सेट वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये क्रिकेट प्लेइंग नेशन्स भारतात येतील, आणि टी -20 च्या वर्ल्डकपसाठी त्यांची एकमेकात चुरस होईल, कारण वर्ल्डकप तर सगळ्याच टीमला आपल्या नावावर करायचा आहे. परंतु टी -20 वर्ल्डकप सुरु होण्याआधीच भारतात कोरोनाने कहर केला आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, जी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा ही जास्त भयानक आणि जलद गतीने पसरणारी आहे. यामध्ये आधीच्या लाटेपेक्षा जास्त मृत्युची नोंद झाली आहे.
अशा परिस्थितीत क्रिकेटशी संबंधित असलेल्या ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूने भारताच्या टी -20 वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करण्याविषयी मोठे विधान केले आहे.
इयान चॅपेल असे ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूचे नाव आहे, ज्याने कोरोनामुळे भारतात टी -20 वर्ल्डकप होणे शक्य नाही असे विधान केले आहे. तो म्हणाले की, "भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता टी -20 वर्ल्डकप भारतात होऊच शकत नाही, ही कॅामनसेन्सची बाब आहे." कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता चॅपेलने हे म्हंटले आहे.
अहवालानुसार आयसीसी (ICC) सतत भारतातील कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. यासह ते भारत टी -20 वर्ल्डकप होस्ट करण्याच्या पर्यायाचा शोध घेत आहे. त्यांनी युएईला (UAE) पर्याया म्हणून ठेवले आहे. जेणेकरुन भारतात परिस्थिती सुधारली नाही तर तिथे टी -20 वर्ल्डकप होऊ शकेल. डेली मेलच्या वृत्तानुसार श्रीलंकेकडेही दुसरा एक पर्याय म्हणून भारत पाहत आहे. कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर आयसीसी (ICC) सतत बीसीसीआयशी (BCCI) संपर्क साधत आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
अहवालानुसार आयसीसीचे (ICC) शिष्टमंडळ सध्या भारतात आहे आणि गेल्या आठवड्यात टी -20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्यांच्याकडून 9 स्थळांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. टी -20 वर्ल्डकप ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरू होणार आहे आणि 1 नोव्हेंबरपर्यंत संपणार आहे.
बीसीसीआयने (BCCI) गेल्या वर्षी युएईमध्ये (UAE) आयपीएलचे आयोजन केले होते आणि त्यावेळी भारतातील कोरोना संक्रमन सध्याच्या परिस्थितीपेक्षा कमी होते आणि कमी वेगाने पसरत होते, परंतु सध्याच्या परिस्थितीत ही अत्यंत भयावह आहे.