पंजबा किंग्स संघातील स्टार फलंदाजाने बांधली लगीनगाठ, शेअर करत म्हणाला...

बालपणीच्या मैत्रिणीशी पंजाब किंग्स संघातील स्टार फलंदाजाने केला विवाह, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Updated: Jun 1, 2021, 10:35 AM IST
पंजबा किंग्स संघातील स्टार फलंदाजाने बांधली लगीनगाठ, शेअर करत म्हणाला... title=

मुंबई: पंजाब किंग्स संघातील सुपरस्टार असलेल्या फलंदाजाने नुकताच विवाह केला असून त्याचा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या क्रिकेटपटूला शुभेच्छा देत पंजाब किंग्स संघाने ट्वीटरवर त्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला. IPLमध्ये पंजाब संघाकडून तडफदारपणे फलंदाजी करणाऱ्या निकोलस पूरनने विवाह केला. त्याने आपल्या पत्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिचं स्वागत केलं. 

वेस्ट इंडिजचा धुरंधर फलंदाज निकोलस पूरन याने आपल्या खास मैत्रिणीसोबत विवाह केला. कॅथरीना मिग्युएलसोबत त्याने सात जन्माची गाठ बांधली. नोव्हेंबर 2020 मध्ये IPL संपल्यानंतर या दोघांचीही साखरपुडा केला होता. आपल्या लग्नाविषयी माहिती देताना पूरनने लिहिले की, 'माझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षा दुसरे सुंदर अजून काहीच नाही. वेलकम मिस्टर आणि मिसेस पूरन.' कॅथरीना देखील आयपीएल दरम्यान दिसली होती. 

निकोलस आणि कॅथरीना हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते. सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. कॅथरीनचे दुसरे नाव एलिसा मिग्युएल आहे. निकोलस पुरन निकोलस पूरण IPLमध्ये पंजाब किंग्ज संघाकडून खेळत आहे.

निकोलस आपल्या तुफान फलंदाजीसाठी आणि जबरदस्त फील्डिंगसाठी तो प्रसिद्ध आहे. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये म्हणावी तेवढी कामगिरी त्याने केली नाही. UAEमध्ये होणाऱ्या उर्वरित 31 सामन्यांमध्ये त्याची कामगिरी यावेळी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आधीच्या 7 पैकी 4 सामन्यांमध्ये निकोलस शून्यवर आऊट झाला होता.