दुबई : आयपीएल (IPL 2020) मध्ये झालेल्या आजच्या सामन्यात किंग्स इलेवन पंजाब (KXIP)चा कर्णधार केएल राहुलने धडाकेबाज खेळी करत पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली आहे. पंजाबचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) ने नवी उंची गाठली आहे. सामन्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये फोर मारत त्याने २००० रन पूर्ण केले आहेत. असं करणारा तो २० वा भारतीय खेळाडू आगहे. केएल राहुलने ६९ सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
केएल राहुलने दुसरीकडे आज तुफानी शतक ठोकलं आहे. राहुलने फक्त ६९ बॉलमध्ये नाबाद १३२ रनची तुफानी खेळी केली आहे. राहुलने १४ फोर आणि ७ सिक्स ठोकत १३२ रन केले. आयपीएलमधील केएल राहुलचं हे दुसरं शतक आहे. त्याने याबाबत वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे. सेहवागने आयपीएलमध्ये २ शतक ठोकले आहेत. रहाणे, मुरली विजय आणि संजू सॅमसनने देखील २ शतक ठोकले आहेत.
What an innings this by the @lionsdenkxip Skipper.
Take a bow, @klrahul11 pic.twitter.com/eHDDlVzTaJ
— IndianPremierLeague (@IPL) September 24, 2020
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली अव्वल आहे. कोहलीने आतापर्यंत ५ शतक ठोकले आहेत. आयपीएल २०२० सीजन मधील हे पहिलं शतक आहे.