IPL 2020 : मुंबई-चेन्नई पहिल्याच सामन्यात भिडणार, पाहा कोणाचा पगडा भारी

आयपीएलच्या १३व्या मोसमाच्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे.

Updated: Sep 8, 2020, 07:10 PM IST
IPL 2020 : मुंबई-चेन्नई पहिल्याच सामन्यात भिडणार, पाहा कोणाचा पगडा भारी title=

दुबई : आयपीएलच्या १३व्या मोसमाच्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. १९ सप्टेंबरला आयपीएल इतिहासातल्या सगळ्यात यशस्वी असलेल्या दोन टीम मुंबई आणि चेन्नईमध्ये पहिला सामना होणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे मार्च महिन्यात सुरू होणारी आयपीएल यंदा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तसंच भारतातली कोरोनाची स्थिती बघता संपूर्ण स्पर्धा युएईमध्ये होणार आहे. 

मुंबई-चेन्नईमध्ये कोण भारी?

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने सर्वाधिक म्हणजेच ४ वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. तर धोनीच्या चेन्नईला ३ वेळा आयपीएल जिंकता आली आहे. आयपीएल इतिहासात मुंबई आणि चेन्नई यांच्यात २८ मॅच झाल्या आहेत. या २८ मॅचमध्ये १७ मॅच मुंबईने जिंकल्या तर ११ मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला. 

चेन्नई आणि मुंबईच्या टीममध्ये ४ वेळा आयपीएल फायनल झाल्या आहेत, यातल्या ३ मॅचमध्ये मुंबईचा आणि १ मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला. आयपीएल फायनलमध्ये २०१० साली या दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध खेळल्या. या मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला. तर २०१३, २०१५ आणि २०१९ साली मुंबईने फायनलमध्ये चेन्नईला पराभवाची धूळ चारली.