IPL 2019: मयंती लँगरकडून पुन्हा पतीचा बचाव! ट्रोलरना सडेतोड प्रत्युत्तर

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थानच्या टीमचं प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न आणखी कठीण झालं आहे.

Updated: Apr 17, 2019, 05:29 PM IST
IPL 2019: मयंती लँगरकडून पुन्हा पतीचा बचाव! ट्रोलरना सडेतोड प्रत्युत्तर title=

मोहाली : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थानच्या टीमचं प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न आणखी कठीण झालं आहे. पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थानचा १२ रननी पराभव झालाय पंजाबने ठेवलेल्या १८३ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १७० रनपर्यंत मजल मारता आली. राजस्थानच्या टीमने या मोसमात पहिल्यांदाच स्टुअर्ट बिनीला संधी दिली. बिनीने आपल्या छोट्या खेळीमध्ये फटकेबाजी केली, पण त्याला राजस्थानला जिंकवून देता आलं नाही. बिनीने ११ बॉलमध्ये ३३ रन केले, यामध्ये ३ सिक्स आणि २ फोरचा समावेश होता.

स्टुअर्ट बिनीच्या या खेळीनंतर सोशल नेटवर्किंगवर त्याची पत्नी मयंती लँगरला ट्रोल करायला सुरुवात झाली. 'आता मयंती एकटीचाच डीपी ठेवणार नाही, पतीलाही डीपीमध्ये घेईल', अशी कमेंट एकाने केली. याआधीही मयंती लँगरने सोशल नेटवर्किंगवर एकटीचा फोटो डीपी म्हणून ठेवल्याने तिला ट्रोल करण्यात आलं होतं. सोबत पतीचा फोटो का नाही? असा सवाल तिला ट्रोलरनी विचारला होता.

पंजाब आणि राजस्थानविरुद्धच्या मॅचवेळी मयंतीने एका ट्रोलरला प्रत्युत्तर दिलं आहे. 'स्टुअर्ट बिनी कुठे आहे? या क्षितीजावर तर नक्कीच नाही,' असं ट्विट करत एका युजरने मयंतीला टॅग केलं. मयंतीनेही या यूजरला प्रत्युत्तर दिलं. तू आजची आयपीएलची मॅच बघितली नाहीस का? असा सवाल मयंतीने या युजरला विचारला. मयंती लँगर ही सध्या स्टार स्पोर्ट्सवर आयपीएलचे कार्यक्रम करत आहे.