IPL मधील पहिली मॅच कोण जिंकणार हे टॉसपूर्वीच झालं होतं निश्चित?

आयपीएलचा फिव्हर क्रीडाप्रेमींवर पसरण्यास सुरुवात झाली आहे. आयपीएल ११ मधील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Apr 7, 2018, 09:27 PM IST
IPL मधील पहिली मॅच कोण जिंकणार हे टॉसपूर्वीच झालं होतं निश्चित? title=
Image: @IPL Twitter

मुंबई : आयपीएलचा फिव्हर क्रीडाप्रेमींवर पसरण्यास सुरुवात झाली आहे. आयपीएल ११ मधील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे. मॅचच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, टॉस करण्यापूर्वीच मॅच मुंबई इंडियन्स जिंकणार हे स्पष्ट झालं आहे, पाहूयात कसं ते...

पहिली मॅच कोण जिंकणार हे निश्चित?

दोन वर्षांनी चेन्नई सुपर किंग्ज महेंद्रसिंग धोनीच्या नेत्रृत्वात आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. तर, रोहित शर्माच्या नेत्रृत्वात असलेल्या मुंबई इंडियन्स टीमने आयपीएलमधील सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवलं आहे. या दोन्ही टीम्समध्ये रंगतदार मॅच सुरु झाली आहे. मात्र, या ही मॅच कोण जिंकणार हे आकड्यांवरुन जवळपास निश्चित आहे.

मुंबई इंडियन्सचा विजय

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोन वेळा सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये मॅच झाली आहे. या दोन्ही मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने बाजी जिंकली आहे. आकड्यांनुसार, पहिल्या मॅचमध्ये धोनीच्या टीमने कधीच मुंबई विरोधात विजय मिळवला नाहीये.

पाहूयात आकडे काय सांगतात...

आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिले बॅटिंग करताना सात विकेट्स गमावत १६५ रन्स बनवले होते. या मॅचमध्ये कॅप्टन सचिन तेंडुलकरने नॉट आऊट ५९ रन्सची इनिंग खेळली होती. हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या टीमने सात विकेट्स गमावत १४६ रन्सपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने ही मॅच १९ रन्सने जिंकली.

तीन वर्षांनंतर म्हणजेच २०१२ च्या पहिल्या मॅचमध्ये पुन्हा एकदा मुंबई आणि चेन्नईची टीम समोरासमोर आल्या. यावेळी धोनी आणि त्याच्या होम ग्राऊंडवर ही मॅच झाली. चार एप्रिल २०१२ रोजी खेळण्यात आलेल्या या मॅचमध्ये चेन्नईच्या टीमने १९.५ ओव्हर्समध्ये ११२ रन्स केले. त्यानंतर मुंबईच्या टीमने हे आव्हान १६.५ ओव्हर्समध्येच गाठत विजय मिळवला.

आता आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा सलामीच्या मॅचमध्ये दोन्ही टीम्स एकमेकांविरोधात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते जुनी आकडेवारी दाखवत आपल्याच टीमचा विजय होणार असा दावा करत आहेत.