नागपूर : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा एक इनिंग आणि २३९ रन्सने धुव्वा उडवत विजय मिळवला. या विजयासोबतच टीम इंडियाच्या आर. अश्विन याने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
नागपूर टेस्ट मॅचमध्ये आर अश्विन याने श्रीलंकेविरोधात ८ विकेट्स घेत टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी केली आहे. त्यासोबतच एक वर्ल्ड रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे.
अश्विनने ऑस्ट्रेलियन बॉलरचा रेकॉर्ड मोडला आहे. आर अश्विनने सर्वात जलद ३०० विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फास्ट बॉलर डेनिस लिली याचा रेकॉर्ड तोडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली याने टेस्ट क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेण्यासाठी ५६ मॅचेस खेळल्या. तर, आर अश्विनने केवळ ५४ मॅचेसमध्ये हा कारनामा केला आहे.
आर अश्विनने नागपूर टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट्स घेतले होते. तर दुसऱ्या इनिंगमध्येही त्याने चार विकेट्स घेतले. या मॅचमधील शेवटचा विकेट घेत तो जगातील सर्वात जलद ३०० टेस्ट विकेट्स घेणारा बॉलर बनला.
दुसऱ्या इनिंगमध्ये आर अश्विनने सर्वात आधी शनाकाला १७ रन्सवर माघारी धाडले. त्यानंतर परेराला शून्यावर आऊट केलं. मग पुन्हा हेराथला शून्यावर आऊट केलं. तर शेवटी गमगेलाही शुन्यावर आऊट करत अश्विनने आपल्या टेस्ट क्रिकेटमध्ये ३०० रन्स पूर्ण केले.
300th Test wicket for @ashwinravi99 and #TeamIndia take a 1-0 lead in the 3-match Test series. India seal the 2nd Test in Nagpur by an innings and 239 runs #INDvSL pic.twitter.com/mq56alEczD
— BCCI (@BCCI) November 27, 2017
आर अश्विन याने यापूर्वीही डेनिस लिलीचा रेकॉर्ड मोडला होता. अश्विनने सर्वाज जलद गतीने २५० विकेट्स घेत लिलीला मागे टाकलं होतं. अश्विनने ४५ टेस्ट मॅचेसमध्ये २५० विकेट्स घेतले. तर, डेनिस लिलीने २५० विकेट्स घेण्यासाठी ४८ टेस्ट मॅचेस खेळल्या होत्या.