कोलकाता : कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर सुरु असलेल्या मॅचमध्ये श्रीलंकन टीम मजबूत स्थितीत पोहोचली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेच्या टीमने ४ विकेट्स गमावत १६५ रन्स केले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी दिनेश चंडीमल १३ रन्स आणि निरोशन डिकवेला १४ रन्सवर खेळत आहेत. मात्र, अद्यापही श्रीलंकेची टीम भारताने केलेल्या स्कोरपेक्षा ७ रन्सने मागे आहे.
यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीला ५ विकेट्स गमावत ७४ रन्स करुन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने १७२ रन्स केले. टीम इंडियाकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक म्हणजेच ५२ रन्स केले. रिद्धिमान साहाने २९ रन्स, रविंद्र जाडेजाने २२ रन्स, भुवनेश्वर कुमार १३ रन्स, मोहम्मद शमीने २४ रन्स केले.
That's it from Day 3. The play has been called off earlier than normal due to bad light. India 172, Sri Lanka 165/4 with U Yadav & B Kumar bagging two each #INDvSL pic.twitter.com/TTq0Bazhor
— BCCI (@BCCI) November 18, 2017
श्रीलंकन टीमकडून सुरंगा लकमलने चार विकेट्स घेतले.