नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये एक आगळा वेगळा नजारा पहायला मिळाला.
मैदानात आणि मैदानाबाहेर विराट कोहली-महेंद्र सिंग धोनी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. इतकेच नाही तर विराट कोहली हा धोनीचा खूपच आदरही करतो. ज्यावेळी धोनीने कॅप्टनशीप सोडली होती त्यावेळी विराटने ट्विट करत म्हटलं होतं की, "धोनी भावा, तु नेहमीच माझा कॅप्टन राहशील."
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वन-डे सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये विराट आणि धोनीच्या मैत्रीचा एक नजारा पून्हा पहायला मिळाला.
The Bromance #TeamIndia #INDvNZ pic.twitter.com/HBhP0dhYPl
— BCCI (@BCCI) October 22, 2017
झालं असं की, न्यूझीलंड विरोधात बॅटिंगसाठी मैदानात उतरेल्या महेंद्रसिंग धोनी याच्या डोळ्यात अचानक कचरा गेला. त्यानंतर तो कचरा डोळ्यातून काढण्यासाठी क्रिजवर उपस्थित असलेला विराट कोहली पूढे सरसावला.
विराट कोहली धोनीजवळ गेला आणि त्याच्या डोळ्यात फूंकर मारत कचरा काढला. दोन्ही क्रिकेटर्समधील हे मित्रप्रेम कॅमेऱ्यातही कैद झालं. बीसीसीआयने हा व्हिडिओ आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
दरम्यान, टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने आपल्या २००व्या वन-डे क्रिकेटमॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग करत ३१वी सेंच्युरी लगावली आहे. विराट कोहलीने केलेल्या या जबरदस्त बॅटिंगमुळे टीम इंडियाला २८० रन्सचा आकडा गाठता आला.
मात्र, असे असले तरीही टीम इंडियाला पहिल्याच वन-डे मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.