आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंची मोठी झेप

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर...

Updated: Oct 1, 2018, 10:15 AM IST
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंची मोठी झेप title=

मुंबई : यंदाची आशिया कप सिरीज टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळली. त्याच्याच नेतृत्वात टीम इंडियाने यंदाचा आशिया कप ही जिंकला. कर्णधार म्हणून रोहित शर्माने त्याची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे निभावली. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे आयसीसी वन डे क्रिकेट रँकिंगमध्ये रोहितने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

विराट कोहली अव्वल स्थानी

रोहित शर्माने 5 सामन्यांमध्ये 105.66 च्या रनरेटने 317 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने आशिया कप जिंकला. आयसीसीने जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीत भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली 884 गुणांकासह पहिल्या स्थानी कायम आहे.

जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानी

वन डे गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह 797 गुणांसह पहिल्या स्थानी तर अफगाणिस्तानचा स्पिनर रशीद खान 788 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. बुमराहने आशिया कपमध्ये 8 विकेट घेतल्या. अफगाणिस्तानच्या रशीद खानने 5 सामन्यांमध्ये 10 विकेट मिळवत आयसीसी वन डे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी मजल मारली आहे. याच यादीत कुलदीप यादवने देखील तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

टॉप 10 बॅट्समन वनडे

1) विराट कोहली    - 884
2) रोहित शर्मा       - 842
3) जो रुट              - 818
4) डेव्हिड वॉर्नर      - 803
5) शिखर धवन       - 802 
6) बाबर आझम      - 798 
7) रॉस टेलर           - 785 
8) क्विंटन डिकॉक   - 781 
9) केन विलियम्सन - 778
10) जॉनी बेअरस्टो  - 769