Team India | टीम इंडियाला रोहितच्या कॅप्टन्सीत मिळाला सेहवागसारखा स्फोटक बॅट्समन

टीम इंडियाला (Team India) वीरेंद्र सेहवागसारखाच (Virender Sehwag)  किंबहुना त्यापेक्षा घातक आणि स्फोटक ओपनर बॅट्समन मिळाला आहे.  

Updated: Feb 25, 2022, 02:41 PM IST
Team India | टीम इंडियाला रोहितच्या कॅप्टन्सीत मिळाला सेहवागसारखा स्फोटक बॅट्समन title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : टीम इंडियाला (Team India) वीरेंद्र सेहवागसारखाच (Virender Sehwag)  किंबहुना त्यापेक्षा घातक आणि स्फोटक ओपनर बॅट्समन मिळाला आहे. टीम इंडियाला आणि क्रिकेट चाहत्यांना सेहवागच्या फटकेबाजीची उणीव आता भासणार नाही, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. कारण, हा बॅट्समन अगदी सेहवागच्या तोडीचा आहे, जो गोलंदाजांना बॅटने चोप चोप चोपतो. ज्या प्रकारे सेहवागने टीम इंडियाला शानदार सुरुवात मिळवून दिली, त्याच प्रकारे हा बॅट्समन अपेक्षित ओपनिंग करवून देण्यात पटाईत आहे. (indian cricket team under captaincy in rohit sharma opener ishan kishan played like that virender sehwag against sri lanka  t 20i series 1st match at lucknow)

कोण आहे तो ओपनर?

रोहित शर्माने कॅप्टन झाल्यापासून अनेक युवा खेळाडूंना टीम इंडियात संधी दिली आहे. हे सर्व खेळाडू प्रतिभावान आहेत. यापैकी एक म्हणजेच (Ishan Kishan) ईशान किशन. रोहित आपल्या कॅप्टन्सीत ईशानवर विश्वास दाखवत त्याला ओपनिंगला पाठवलं. ईशाननेही रोहितचा विश्वास सार्थ ठरवला.

ईशानला वेस्ट इंडिज विरुद्ध विशेष काही करता आलं नाही. मात्र याची उणीव ईशानने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात भरुन काढली.  

ईशानने लंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये  रोहितसोबत ओपनिंग करताना 111 धावांची सलामी भागीदारी केली. या 111 धावांमध्ये रोहितचं योगदान होतं ते अवघ्या 44 धावाचं.  

ईशानने या सामन्यात एकूण 56 बॉलमध्ये 10 कडक फोर आणि 3 खणखणीचत सिकस ठोकत 89 धावांची सुपरहिट खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मैदानात चौफेर फटकेबाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. 

ईशान बॅटिंगसोबत शानदार विकेटकीपिंगही करतो. त्यामुळे ईशान बहुपयोगी खेळाडू आहे. रोहित आणि ईशान आयपीएलमध्ये एकत्र खेळले आहेत. त्यामुळे दोघांची ओपनर म्हणून जोडी हिट आहे. दोघांमध्ये योग्य ताळमेल आहे, जो की ओपनिंग जोडीमध्ये असणं महत्त्वाचं असतं.

एका ओपनरमध्ये असलेले सर्व आवश्यक गुण हे ईशामध्ये आहेत. ईशान अगदी पहिल्याच चेंडूपासून सेहवागसारखा प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडतो. आयपीएलमध्ये त्याने ओपनिंग करताना खोऱ्याने धावा केल्या आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये कॅप्टन विराट कोहलीने ईशानला रोहितच्या जागी ओपनिंग करण्याची संधी दिली होती. 

थोडक्यात काय तर ईशानने प्रत्येक संधीचं सोनं केलं आहे. ईशानने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात धमाकेदार खेळी केली. त्यामुळे येत्या उर्वरित 2 सामन्यांमध्येही ईशानकडून अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे.