Ajinkya Rahane : मराठमोळ्या रहाणेला BCCI कडून मोठा धक्का; आता फक्त निवृत्ती…!

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेसाठी टाम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद? BCCI ने माजी कर्धघाराविषयी घेतला कठोर निर्णय. या निर्णयानंतर अजिंक्य नेमका काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष.   

Updated: Mar 27, 2023, 07:11 AM IST
Ajinkya Rahane : मराठमोळ्या रहाणेला BCCI कडून मोठा धक्का; आता फक्त निवृत्ती…! title=
Indian Cricket player Ajinkya rahane missed from the list BCCI Announced annual contract latest Marathi news

Ajinkya Rahane : भारतीय संघात संयमी खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणे याचा चाहता वर्ग लहान नाही. क्रिकेटचं मैदान असो किंवा आणखी काही, रहाणेचा शांत स्वभाव सर्वांच्याच मनाचा ठाव घेऊन जातो. पण, मैदानावर मात्र गेल्या काही काळापासून फारशी प्रभावी कामगिरी करु न शकल्यामुळं सध्या हाच अजिंक्य अडचणींना तोंड देताना दिसत आहे. त्यातच BCCI कडून त्याला जबर धक्का देण्यात आला आहे. ज्यामुळं अजिंक्यच्या क्रिकेट कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळू शकते. (Indian Cricket player Ajinkya rahane missed from the list BCCI Announced annual contract latest Marathi news)

BCCI नं रविवारी रात्रीच्या सुमारास 2022- 23 वार्षिक कराराची घोषणा केली. यामध्ये संजू सॅमसन (Sanju Samson), केएस भरत (KS Bharat) यांसारख्या खेळाडूंना स्थान देण्यात आलं. एकिकडे काही खेळाडूंची पहिल्यांदाच या यादीत वर्णी लागली आणि दुसरीकडे मात्र दिग्गद नावांना बीसीसीआयनं वगळलं. 

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांसारख्या खेळाडूंसह काही इतरही खेळाडूंना बीसीसीआयनं नव्या करारात स्थान दिलेलं नाही. यामध्ये हनुमा विहारी (Hanuma Vihari), मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), दीपक चाहर (Deepak Chahar) यांच्याही नावांचा समावेश आहे. 

कोणते खेळाडू बीसीसीआयशी करारबद्ध? 

बीसीसीआयकडून वार्षिक कराराच्या ए+ श्रेणीमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांच्या नावांचा समावेश आहे. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळं गेला बराच काळ संघापासून दूर आहे. क्रिकेटच्या मैदानावर तो नेमका कधी परतेल याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नसतानाही त्याला बीसीसीआयच्या पहिल्या श्रेणीत स्थान मिळालं आहे ही बाब नजरा वळवत आहे. 

हेसुद्धा वाचा : WPL 2023 Final: पहिल्या हंगामाची क्विन 'Mumbai Indians'; दिल्लीचा पराभव करत रचला इतिहास!

 

त्यामागोमाग A श्रेणीमध्ये रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, रिषभ पंत, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश आहे. B श्रेणीत केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांची  नावं आहेत. तर, दीपक हुड्डा, इशान किशन आणि अर्शदीप सिंग यांनाही बीसीसीआयनं करारबद्ध केलं आहे. त्याव्यतिरिक्त या यादीत शिखर धवन, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंचाही समावेश आहे. 

कोणत्या खेळाडूला मिळणार किती मानधन? 

ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी A+ श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये, A श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी रुपये, B श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी रुपये आणि C श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळणार आहेत. 

एकिकडे खेळाडूंना कोट्यवधींच्या घरात मानधन मिळणार असतानाच दुसरीकडे केएल राहुल, शार्दुल ठाकुर या खेळाडूंचं नुकसान झालं आहे. तर, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांना  मात्र इथं फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.