बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 फायनलमध्ये भारतानं टॉस जिंकला

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 फायनलमध्ये भारतानं टॉस जिंकला आहे.

Updated: Mar 18, 2018, 06:48 PM IST
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 फायनलमध्ये भारतानं टॉस जिंकला  title=

कोलंबो : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 फायनलमध्ये भारतानं टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये पहिले फिल्डिंग करायचा निर्णय रोहित शर्मानं घेतला आहे. यंदाच्या मोसमातला भारताचा हा शेवटचा सामना असेल. यानंतर सगळे खेळाडू आयपीएलमध्ये त्यांच्या टीमकडून खेळतील. श्रीलंकेचा पराभव करुन बांग्लादेश या सीरिजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या सीरिजमधली श्रीलंकेविरुद्धची पहिली टी-20 भारतानं गमावली तर बांग्लादेशविरुद्धच्या दोन्ही टी-20 आणि श्रीलंकेविरुद्धची उरलेली एक टी-20 भारतानं जिंकली. या सीरिजमधल्या एकूण ४ टी-20 भारतानं जिंकल्या. तर बांग्लादेशनं या सीरिजच्या दोन्ही मॅचमध्ये श्रीलंकेचा पराभव केला.

भारताचं पारडं जड

या सीरिजमध्ये भारतानं दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत ही सीरिज खेळतोय. पण तरीही या मॅचमध्ये भारताचंच पारडं जड आहे. आत्तापर्यंत भारत आणि बांग्लादेशमध्ये ७ टी-20 मॅच झाल्या आहेत. या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. त्यामुळे ही मॅच जिंकून विजयी गुढी उभारण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.

अशी आहे भारतीय टीम

रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, लोकेश राहुल, मनिष पांडे, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, युझवेंद्र चहल 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा