डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने दिमाखात फायनलममध्ये प्रवेश केलाय.
सेमीफायनलमध्ये भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या २८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २४५ धावांवर आटोपला.
भारताने टॉस जिंकताना पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीत कौरच्या नाबाद १७१ धावांच्या जोरावर भारताने २८२ धावांचे भलेमोठे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले.
हरमनप्रीतने ११५ चेंडूत २० चौकार आणि ७ षटकार लगावताना १७१ धावा तडकावल्या. कर्णधार मिताली राजने ३६ धावा केल्या. दीप्ती शर्माने २५ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २४५ धावांत आटोपला. झुलन गोस्वामी आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी दोन विकेट, दीप्ती शर्माने तीन घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले.
फायनलमध्ये २३ जुलैला भारताची लढत इंग्लंडशी होणार आहे.