WI vs IND : सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, १ इनिंग आणि १४१ रन्सने भारताचा विजय

वेस्ट इंडिज विरूद्ध भारत यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 15, 2023, 03:19 AM IST
WI vs IND : सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, १ इनिंग आणि १४१ रन्सने भारताचा विजय title=

WI vs IND 1st Test : वेस्ट इंडिज विरूद्ध भारत यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. एक इनिंग आणि १४१ रन्सने टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवलाय. वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अवघ्या १३० रन्सवर ॲाल आऊट करत टेस्ट सिरीजमध्ये भारताने १-० अशी  आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिजचा संघ १३० रन्समध्ये गारद

टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट्य गमावत ४२१ रन्सवर डाव घोषित केला. तिसरा उर्वरित दिवस विंडींज खेळून काढेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या सर्व फलंदाजांना दिवस संपण्यापूर्वीच पव्हेवलियनचा रस्ता दाखवला होता. दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजला अवघे १३० रन्स करता आले.

अश्विन ठरला खरा विजयाचा शिल्पकार

डोमिनिका टेस्टच्या विजयाचा खरा शिल्पकार रविचंद्रन अश्विन ठरला आहे. अश्विनने दोन्ही इनिंग्जमध्ये १२ विकेट्स काढले आहेत. यावेळी पहिल्या डावात त्याने ५ तर दुसऱ्या डावात ७ विकेट्स घेत विंडीजच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. दोन्ही इनिंगमध्ये रविंद्र जडेजाने ५ तर सिराजने २ विकेट्स घेतलेत

यशस्वी जयस्वाल ठरला ‘मॅन आॅफ द मॅच’

विंडसर पार्क डोमिनिकामध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात डेब्यू करणारा यशस्वी जयस्वालने ( Yashasvi Jaiswal ) सेंच्युरी झळकावत स्वतःचं नाण खणखणीत बजावलं. जयस्वालने २८७ बाॅल्समध्ये १७१ रन्सची खेळी केली. यावेळी त्याला ‘मॅन आॅफ द मॅच’ अवाॅर्ड देण्यात आलाय.