भारताचा आर्यलंडवर ७६ धावांनी विजय

टी २० मालिकेत भारताची आघाडी...

Updated: Jun 28, 2018, 11:23 AM IST

मुंबई : रोहित शर्मा आणि शिखर धवनची आक्रमक अर्धशतकं आणि गोलांदाजांच्या अजूक माऱ्याच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघानं मालिकेतील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात आर्यलंडवर ७६ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना आर्यलंडसमोर २०९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना आर्यलंड संघ १३२ धावाच करु शकली. भारताकडून कुलदीप यादवनं ४, यजुवेंद्र चहलनं ३ आणि जसप्रित बुमहारनं २ गडी बाद केले. 

टी-२०मालिकेत भारताची आघाडी

या विजयबरोबरच दोन टी-२०मालिकेत भारतानं १-०नं आघाडी घेतली आहे. भारताचा आणि आर्यलंडचा दुसरा टी-२० सामना शुक्रवारी होणार आहे. या टी-२० मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड मालिकेला सुरुवात होईल.

या दौऱ्यावर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-२०, इंग्लंडविरुद्ध तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि पाच कसोटी मालिका खेळणार आहे.