Ind vs Wi : टीम इंडियाला विजयानंतर मिळाल मोठं सरप्राईज,VIDEO आला समोर

ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं ज्याने खेळाडूंमध्ये उत्साह आला, VIDEO एकदा पाहाच   

Updated: Jul 23, 2022, 05:00 PM IST
Ind vs Wi : टीम इंडियाला विजयानंतर मिळाल मोठं सरप्राईज,VIDEO आला समोर title=

मुंबई : वेस्ट इंडिजविरूद्ध पहिला वनडे सामना टीम इंडियाने जिंकला. या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूला मोठं सरप्राईज मिळालं. या सरप्राईजमुळे त्यांचा आनंद आणखीणच द्विगुणीत झाला. त्यामुळे नेमक काय झालंय ते जाणून घेऊयात.
 
टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरूद्ध पहिला सामना 3 धावांनी जिंकला. या विजयाचा हिरो ठरला कर्णधार शिखर धवन, त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

पहिल्या विजयानंतर सर्व खेळाडू आनंदी आणि उत्साहीत होते. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये त्यांचा आनंद एका दिग्गज खेळाडूने आणखीण द्विगुणित केला. हा दिग्गज म्हणजे वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा होता. त्याने  अचानक टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये 
एन्ट्री घेतली होती.  

या संदर्भातला व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बीसीसीआयने टाळ्यांचा एक इमोजीही लिहिला आहे. म्हणजेच बीसीसीआयने टाळ्यांच्या गजरात लाराचे स्वागत केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

व्हिडिओत काय?
युजवेंद्र चहल, भारतीय कर्णधार शिखर धवन, उपकर्णधार श्रेयस अय्यर यांनी लाराचे स्वागत केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यापूर्वी लाराने टीम इंडियाचे प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविड यांचीही भेट घेतली होती. त्याचा फोटोही बीसीसीआयने शेअर केला आहे. या फोटोला बीसीसीआयने एका फ्रेममध्ये दोन दिग्गज असे कॅप्शन लिहिले आहे.  

असा रंगला सामना 
टीम इंडियाने 7 विकेट्सवर 308 धावा केल्या होत्या. शिखर धवनने 97, शुभमन गिलने 64 आणि श्रेयस अय्यरने 54 धावा केल्या. यानंतर 309 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 305 धावाच करू शकला आणि सामना 3 धावांनी गमावला. या विजयानंतर कर्णधार शिखर धवनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.