IND vs SL: हार्दिक पांड्या कर्णधार होताच या खेळाडूला टीम इंडियात संधी, श्रीलंकेला भरली धडकी !

India VS Sri Lanka: टीम इंडियात बदल करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या T20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात एका धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूने शेवटचा  T20 सामनाही पांड्या याच्या नेतृत्वाखाली खेळला होता.

Updated: Dec 29, 2022, 07:27 AM IST
IND vs SL: हार्दिक पांड्या कर्णधार होताच या खेळाडूला टीम इंडियात संधी, श्रीलंकेला भरली धडकी ! title=

India VS Sri Lanka T20 Series: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात  T20 मालिका होत आहे. या मालिकेत टीमची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असणार आहे. भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध करत असल्याने या मालिकेकडे लक्ष लागले आहे. तीन सामन्यांच्या T20 मालिकेत हार्दिक पांड्याची टीम कशी कामगिरी करणार याची मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, हार्दिक संघात दाखल होताच एक धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूही त्याच्या नेतृत्वाखाली टीममध्ये परतला आहे. हा खेळाडू बांग्लादेश दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग बनू शकला नाही, तर त्याने शेवटचा T20 सामना पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळला होता. त्यामुळे श्रीलंकेत त्याची कामगिरी कशी असेल, याची उत्सुकता असणार आहे.

टीम इंडियात या खेळाडूचे पुनरागमन  

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या पुन्हा एकदा संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे.  या मालिकेत टीम इंडियाच्या नियमित कर्णधाराशिवाय रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली संघाचा भाग नाहीत, अशा परिस्थितीत अष्टपैलू दीपक हुडा याला संघात स्थान देण्यात आले आहे. दीपक हुड्डा T20 विश्वचषक 2022 सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळला आणि या स्पर्धेनंतर त्याने न्यूझीलंड दौऱ्यावर शेवटचा T20 सामना खेळला. या टी-20 मालिकेतही हार्दिक पांड्याच्या संघाचा कर्णधार होता. 

T20 मध्ये शतक ठोकले

टीम इंडियाने यावर्षी आयर्लंडचा दौरा केला, या दौऱ्यावर दीपक हुडा याने टी-20 सामन्यात शतक झळकावले. दीपक हुड्डा हा आपल्या बॅटनेच बोलत आला आहे. तो चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो.अशा परिस्थितीत दीपक हुड्डा हाही या मालिकेत कर्णधार पांड्याची पहिली पसंती ठरु शकतो. 

टीम इंडियातील दीपक हुडा याची कामगिरी

27 वर्षीय दीपक हुड्डा टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 15 टी-20 आणि 10 एकदिवसीय सामने खेळला आहे. दीपक हुडाने या T20 सामन्यांमध्ये 33.56 च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत आणि 5 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर या वनडेमध्ये त्याने 153 धावा आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत. 

श्रीलंका टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया 

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार, शिवम मावी.