SA vs IND : दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्याची अचानक वेळ बदलली, BCCI मुळे गोंधळ! पाहा कधी सुरू होणार सामना?

SA vs IND 2nd T20I : साऊथ अफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना संकटाला सामोरं जावं लागलंय. अशातच आता दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 11, 2023, 09:39 PM IST
SA vs IND : दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्याची अचानक वेळ बदलली, BCCI मुळे गोंधळ! पाहा कधी सुरू होणार सामना? title=
SA vs IND 2nd T20I

South Africa vs India : पहिला सामना पावसामुळे वाहून गेल्याने अनेक भारतीयांचा तसेच खेळाडूंचा देखील हिरमोड झाल्याचं पहायला मिळालं. भारताच्या युवा खेळाडूंना टी-20 विश्वचषकासाठी आपला दावा बळकट करण्याची नुकती संधी गमावली. जूनमध्ये होणार्‍या टी-ट्वेंटी वर्ड कप 2024 आधी, भारताकडे या फॉरमॅटमध्ये आणखी फक्त पाच सामने खेळायचे आहेत. त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा असं समीकरण टीम इंडियाचं होतं. अशातच आता साऊथ अफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना संकटाला सामोरं जावं लागलंय. अशातच आता दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात दुसरा सामना 12 डिसेंबरला गकेबेरहा येथे खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होणार आहे. मात्र,  बीसीसीआयच्या वेबसाइटमुळे गोंधळ उडाला होता. वेबसाईटवर सामन्याची वेळही फक्त संध्याकाळी 7.30 वाजता देण्यात आली होती. मात्र, दुसरा आणि तिसरा सामना 8.30 वाजता सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा सामना 12 किंवा 1 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. 

पावसाचं वातावरण कसं असेल?

दुसऱ्या सामन्यावर देखील पावसाचं सावट असणार आहे. accuweather.com च्या मते, 12 डिसेंबर रोजी गकेबेरहामध्ये पावसाची शक्यता 80 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे आता दुसरा सामना पावसात वाहून जाण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिका : एडॅन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी.

टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.

टी-ट्वेंटी मालिकेचं वेळापत्रक

10 डिसेंबर -  पहिला टी20 सामना, डरबन 
12 डिसेंबर, दूसरा टी20 सामना, पोर्ट एलिजाबेथ 
14 डिसेंबर, तीसरा टी20 सामना, जोहानसबर्ग.